कु. इंदिरा महादाने जिल्हास्तरीय द्वितीय पारितोषिकाने सन्मानित

0
30

अर्जुनी-मोर. –अर्जुनी मोरगाव (क्र. २) येथील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कु. इंदिरा शामराव महादाने यांनी जिल्हा व तालुका स्तरावर इंग्रजी विषयात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवून शाळेचा गौरव वाढविला आहे.

गुरुनानक स्कूल, गोंदिया येथे झालेल्या जिल्हास्तरीय बक्षीस वितरण सोहळ्यात सुधीर महामुनी (प्राथमिक शिक्षणाधिकारी),महेंद्र गजभिये (माध्यमिक शिक्षणाधिकारी) आणि डायटचे प्राचार्य वैद्य  यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले.  ही स्पर्धा पुणे मार्फत शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३’ अंतर्गत घेण्यात आली होती. त्यामध्ये राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर शिक्षकांनी सहभाग नोंदविला होता. कु. इंदिरा महादाने यांनी आपल्या उत्कृष्ठ शिक्षणपद्धतीच्या जोरावर हा सन्मान पटकावला.या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, अर्जुनी मोरगाव (क्र. २) तसेच पालकवर्गाने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.