अर्जुनी-मोर.- शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, अर्जुनी/मोर क्र. १ येथील कार्यरत शिक्षिका कु.नमिता गजानन लोथे यांनी यश मिळविले.शिक्षकांच्या कल्पकतेचा सर्वांना उपयोग व्हावा याकरिता ही स्पर्धा शिक्षकांकरिता विविध विषयांसाठी व वर्गानुसार घेण्यात आली होती.यात कु. नमिता गजानन लोथे यांनी इ. १ ली – २री च्या गटात भाषा विषयाचा उत्तम असा स्वनिर्मित व्हिडिओ सादर करून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाला गवसणी घातली.
गोंदिया येथे आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात त्यांना सुधीर महामुनी साहेब शिक्षणाधिकारी प्राथ., महेंद्र गजभिये साहेब शिक्षणाधिकारी माध्यमिक व नरेश वैद्य प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल गटसाधन केंद्र,अर्जुनी मोर, व्यवस्थापन समिती, पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, अर्जुनी/मोर क्र. १ तसेच पालकवर्गाने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.