दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती राज्यस्तरीय स्पर्धा 2023 जिल्हास्तरीय बक्षीस वितरण थाटात

0
84

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे आयोजन; जिल्ह्यातील एकूण 75 शिक्षक जिल्हास्तरीय बक्षिसांनी सन्मानित

गोंदिया,दि.30 : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन द्वारे सन 2023 मध्ये शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे राज्यस्तरीय आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे जिल्हास्तरीय बक्षीस वितरण समारंभ आज दिनांक 29 मार्चला श्री गुरुनानक स्कूल चे वातानुकूलित सभागृहात मोठ्या थाटात संपन्न झाले. या समारंभात जिल्ह्यातील एकूण 75 शिक्षकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. नरेश वैद्य, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुधीर महामुनी, प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. महेंद्र गजभिये, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण सस्थेच्या अधिव्याख्याता पुनम घुले, विभागप्रमुख तथा अधिव्याख्याता डॉ. भाऊराव राठोड तसेच शालेय पोषण आहार चे जिल्हा अधीक्षक तथा लेखाधिकारी प्रवीण वैद्य हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व माता सरस्वती यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

राज्य शासनाच्या वतीने ही व्हिडिओ निर्मिती स्पर्धा एकूण सहा गटात घेण्यात आली होती. ज्यामध्ये शिक्षकांना आपले शैक्षणिक व्हिडिओ तयार करून ते राज्याच्या लिंक वर अपलोड करायचे होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील जवळजवळ 800 शिक्षकांनी भाग घेतला होता ज्यामधून तालुका स्तरावर 331 शिक्षक तर जिल्हास्तरावर 75 शिक्षक पारितोषिकासाठी पात्र ठरले. जिल्हास्तरावरील पारितोषिकांमध्ये प्रथम पारितोषिक 10000 रुपये, द्वितीय पारितोषिक 9000 रुपये तर तृतीय पारितोषिक 8000 रुपये अशी बक्षिसांची रक्कम राज्य शासनाद्वारे निश्चित करण्यात आली होती. तर तालुकास्तरावर प्रथम पारितोषिक 3000 रुपये द्वितीय पारितोषिक 2000 रुपये आणि तृतीय पारितोषिक 1500 रुपये अशी रोख रक्कम शासनाने ठरविली होती. सोबतच सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्याचे निर्देश शासनाचे होते. त्याच अनुषंगाने आज हा जिल्हास्तरीय पारितोषिक बक्षीस वितरण समारंभ आयोजित करून 75 शिक्षकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या द्वारे देण्यात आले. सदर शिक्षकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांची रोख रक्कम 644000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात वळती करण्यात आले. तालुकास्तरीय बक्षिस वितरण समारंभ आयोजित करण्याची जबाबदारी ही सर्व गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आली आहे. तालुकास्तरीय बक्षिसांकरिता जिल्ह्यात एकूण 753000 रु. तरतूद करण्यात आलेली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख अधिव्याख्याता डॉ. भाऊराव राठोड यांनी केले तर उपस्थित शिक्षणाधिकारी प्राथमिक सुधीर महामुनी, शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ महेंद्र गजभिये व अधिव्याख्याता पुनम घुले यांनी उपस्थित पुरस्कारप्राप्त शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. नरेश वैद्य यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षकांनी आपल्या शैक्षणिक अध्यापनात या शैक्षणिक व्हिडिओचा व तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यावर भर द्यावा असे सुचविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय साधनव्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे तर आभार प्रदर्शन सुनील ठाकूर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विषय साधनव्यक्ती भाऊलाल चौधरी, खूमेशकुमार कटरे, ओमप्रकाश ठाकरे, शारदा जिभकाटे, मंगला बडवाईक, अंकला माने यांनी अथक परिश्रम घेतले.

हे ठरले जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिकाचे विजेते : सर्व शिक्षक नमिता गजानन लोथे, त्रिरत्न पिरम लोणारे, हंसराज पांडुरंग खोब्रागडे, नंदकिशोर दामाजी शहारे, संघपाल राधेलाल कानोजे, सरिता देवराम घोरमारे, रुद्रम गोविंदा बारापात्रे, कुलदीप भरतलाल पटले, पवन चंदन खोटेले, नम्रता लितेशकुमार गोस्वामी, परमानंद रामलाल रहाँगडाले, अंगद दिवारु मेश्राम, अनिल मधुशाम वासनिक, कांतीकुमार दादाजी बोरकर, आरती भवानीप्रसाद यादव, हरीशकुमार खत्री, महेश प्रेमलाल बिसेन, असीम अरुण बॅनर्जी, पुष्पकुमार कटरे, संजयकुमार समीर रॉय, मुरलीधर अर्जुनकुमार कुथेकर, अध्यापक विद्यालयाचे अध्यापकाचार्य श्रीराम दुर्गाजी गायधने, टीना पन्नालाल ठाकरे, मीनाक्षी तरुण कटरे, विद्या हिरामण येटरे.