सालेकसा,दि.३१ः बिगिनर स्पोर्ट्स अकादमी, सालेकसा येथील खेळाडू वैष्णवी संतोष गिर्हेपुंजे हिची ५७वी सीनियर राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धा २०२४-२५ साठी निवड झाली आहे. तिच्या या निवडीबद्दल संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. ही स्पर्धा पुरी – ओडिशा येथे आजपासून सुरू होत असून, दिनांक ४ एप्रिल २०२५ पर्यंत चालणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेतून निवड झालेले विद्यार्थी ‘खेलो इंडिया – २०२५’ साठी खेळणार आहेत.
वैष्णवीच्या यशामध्ये तिच्या मेहनतीबरोबरच प्रशिक्षक गोल्डी भाटिया यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांनी अनेक युवा खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी विशेष योगदान दिले आहे.या निवडीबद्दल वैष्णवीचे कुटुंब, प्रशिक्षक आणि अकादमीच्या सदस्यांनी तिचे अभिनंदन केले असून, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.