गोंदिया, दि.1 : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक 2025 चा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून गुरुवार दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील 628 मतदार परिषदेकडे नोंदणीकृत आधुनिक वैद्यक शास्त्रातील व्यावसायिक (डॉक्टर्स) यांना आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अधिष्ठाता यांच्या कक्षाच्या बाजुची रुम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
मतदार परिषदेकडे नोंदणीकृत आधुनिक वैद्यक शास्त्रातील व्यावसायिक (डॉक्टर्स) यांनी आपले नाव मतदार यादीत असल्याबाबत खात्री करण्यासाठी तसेच मतदार यादीत आपल्या नावाचे अनुक्रमांक व इतर बाबींची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, मुंबई यांचे संकेतस्थळ https://www.maharashtramedicalcouncil.in/ यावर जिल्हा निहाय मतदार यादी उपलब्ध करुन दिलेली आहे.
सदर निवडणूकीच्या मतदानासाठी मतदारांनी (मतदार परिषदेकडे नोंदणीकृत आधुनिक वैद्यक शास्त्रातील व्यावसायिक (डॉक्टर्स)) आपली ओळख पटविण्यासाठी पुढीलप्रमाणे नमूद केल्याप्रमाणे कोणतेही एक दस्तऐवज (मुळ दस्तऐवज) सोबत घेवून मतदान केंद्रावर येणे आवश्यक राहील. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र, भारत निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, बँक/टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक, वाहन चालक लायसन, स्थानी खाते क्रमांक (पॅन कार्ड), भारतीय पारपत्र (पासपोर्ट) यापैकी एक दस्तऐवज आवश्यक राहील.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक 2025 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार मतदार परिषदेकडे नोंदणीकृत आधुनिक वैद्यक शास्त्रातील व्यावसायिक (डॉक्टर्स) यांनी गुरुवार दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.