राजुरा तालुक्यातील विविध गावांना भेटी देवुन, ग्रामस्थांशी संवाद
चंद्रपुर,दिनांक 03-चंद्रपुर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी नुकताच राजुरा तालुक्याचा दौरा केलेला असुन, यामध्ये राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्या अंतर्गत क्षेत्रीय भेटीदरम्यान राजुरा तालुक्यातील विविध गावांना भेटी देवुन विविध विकास कामांची पाहणी केली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी राजुरा तालुक्यातील भेटी दरम्यान ग्रामपंचायत सातरी गावाला भेट देवुन, यागावातील क्रिडांगण, फळबाग लागवड, बळीराजा पादंण रस्ता याची पाहणी केली. यासह घरकुल, टॅक्स वसुली, मॉडेल आस्क सेंटर, आयुष्यमान भारत कार्ड व ग्रामपंचायतीचे कामकाज विषयी सखोल आढावा घेतला. ग्रामपंचायत विहीरगाव येथिल भेटी दरम्यान मॉडेल स्कूलच्या कामास भेट देऊन, संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश दिले आहे. ग्रामपंचायत कळमणा यागावात शिवार फेरी करुन, संपूर्ण गावातील विकासकामाची पाहणी केली. यावेळी शालेय विद्यार्थी आणि बचतगटातील महिलांशी व उपस्थित ग्रामस्थांशी चंद्रपुर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी संवाद साधला.गावातील विकास कामा विषयी माहीती जाणुन घेतली. पंचायत समिती राजुरा अंतर्गत मा. मुख्यमंत्री १०० दिवसांचा कार्यक्रमा अंतर्गत ७ कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातुन निर्माण करण्यात आलेल्या विविध सुविधाची पाहणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या राजुरा तालुक्यातील क्षेत्रीय भेटी दरम्यान राजुरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे व तालुका यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.