पंचशील विद्यालयाचा तन्मय गेडाम एनएमएमएस परीक्षेत अनु.जाती प्रवर्गातून जिल्ह्यात अव्वल

0
65

अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील पंचशील विद्यालय बाराभाटी या शाळेतील तन्मय अरविंद गेडाम हा विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (एनएमएमएस) या परीक्षेत अनुसूचित जाती या प्रवर्गातून जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकाविला.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकात मोडणाऱ्या ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या इयत्ता आठवी शिकत असलेल्या पाल्यासाठी दरवर्षी ही परीक्षा आयोजित करण्यात येते. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी पर्यंत शासनाकडून आर्थिक मदत केली जाते. सत्र २०२४ – २५ ची परीक्षा डिसेंबर महिन्यात घेण्यात आली होती.

या परीक्षेत पंचशील विद्यालयातील उमंग धनपाल रामटेके, तन्मय अरविंद गेडाम, विक्रांत सोहनलाल ताराम व अनिकेत किशोर गेडाम हे चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी तन्मय अरविंद गेडाम अनुसूचित जाती प्रवर्गातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवीत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला. या विद्यार्थ्याला आता अठरा हजार रुपये शासनाकडून शिष्यवृत्ती स्वरूपात मिळणार आहे. संस्थेचे सचिव, मुख्याध्यापक तसेच परिसरातील पालक वर्ग यांनी तन्मय गेडाम तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुकासह अभिनंदन केले.