गोंदिया–बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या रेल्वे लाईनला मंजुरी,४८१९ कोटीचा खर्च

0
793

गोंदिया,दि.०४ः- गोंदिया – बल्लारशाह या रेल्वे एकेरी मार्गावर प्रवासी गाड्यासह मालगाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतूकीत अडथळा निर्माण होऊ नये व वेेळेची बचत करण्याकरीता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी २४० कि.मी लांबीच्या दुसऱ्या रेल्वे लाईनला मंजुरी दिली असून, या प्रकल्पासाठी ४,८१९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.
या मार्गावर दुहेरी मार्गामुळे गाड्यांची गती वाढेल आणि विलंब कमी होईल.दुसरी लाईन आल्याने प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग मिळेल. औद्योगिक आणि आर्थिक वाढ: विदर्भातील उद्योग व वाणिज्य केंद्रांना चालना मिळेल.पर्यटन आणि रोजगार संधी: सुधारित रेल्वे सुविधांमुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक रोजगार संधी वाढण्यास मदत होणार आहे.तसेच गोंदिया,भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.