वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू – आमदार राजकुमार बडोले यांनी घेतली सांत्वना भेट

0
153

अर्जुनी-मोर. -तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्र आणि वनविकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या शिवरामटोला (भरनोली) येथे मोहफुले संकलन करत असताना अनुसया धानु कोल्हे या महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केल्याची दुर्दैवी घटना २३ मार्च रोजी घडली.

आज आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात आणि पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशा सूचना दिल्या.

या प्रसंगी माजी जि.प. उपाध्यक्ष तथा सदस्य यशवंत गणवीर, माजी जि.प. सभापती प्रकाश गहाणे, माजी पं.स. सभापती तानेश ताराम, युवक राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा प्रमुख योगेश नाकाडे, रेखाताई पालीवाल, विलास बोरकर, शिवम मुंगणकर आदी उपस्थित होते.