गोंदिया,दि.०६ः तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय दवनीवाडाचे ३ विद्यार्थी एनएमएमएस उत्तीर्ण झाले असून १ विद्यार्थी शिष्यवृत्तकरीता पात्र ठरल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. २२ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या एनएमएमएस परिक्षेत चा निकाल लागला असून यशाची परंपरा कायम ठेवत दवनीवाडा येथील जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील आठव्या वर्गातील ०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यापैकी एनएमएमएस स्कॉलरशिप साठी १ विद्यार्थीनी पात्र ठरली. दिप्ती अजय भोंडेकर, तनवी विनोद मेश्राम पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
स्कॉलरशिप परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे प्राचार्य एम.एम. बघेलेर,जि.प.सदस्या अंजलीताई अटरे,पंचायत समिती सदस्य शंकर टेंभरे, शाळा शिक्षण समिती सदस्य लक्ष्मीताई श्रीबांसरी,राजेश उरकुडे,सुरेंद्र अग्रवाल, प्रितीताई सेलोटे,अल्काताई मेश्राम,स्वातीताई टेंभरे,गौरीशंकर बिसेन,शिरीष श्रीबांसरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.प्रसंगी शाळा शिक्षण समिती, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थिती होते.विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेतील प्राचार्य, शिक्षक, माता पालक यांना दिले आहे.