जिल्हा परिषद आरोग्य विभागाने साजरा केला जागतिक आरोग्य दिन

0
67

गोंदिया, दि. 08- 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन कार्यक्रम जिल्हा परिषद आरोग्य विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या एकत्रित सहकार्याने साजरा करण्यात आला. १९४८ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) स्थापनेचा वर्धापन दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. दरवर्षी, जागतिक आरोग्य दिन हा जगभरातील लोकांना प्रभावित करणाऱ्या विशिष्ट आरोग्य विषयाकडे लक्ष वेधण्याची संधी म्हणून वापरला जातो.आरोग्य ही माणसाची सर्वात महत्त्वाची आणि अमूल्य संपत्ती आहे.त्यामुळे जागतिक आरोग्य दिनी समाजात आरोग्याशी संबंधित समस्या आणि आरोग्यासंबंधित अधिकार याबद्दल आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यात येते.दरवर्षी एका विशिष्ट थीमवर भर देऊन, जागतिक आरोग्य दिन सरकारे, आरोग्यसेवा संस्था आणि व्यक्तींना आरोग्य मानके सुधारण्यासाठी आणि आरोग्यसेवेची उपलब्धता सुधारण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यास प्रोत्साहित करत असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी यावेळी दिली आहे.
2025 मध्ये ज्याची थीम “निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य” (Healthy Beginnings, Hopeful Futures) असणार आहे, जी माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करेल. माता आणि बाळांचे आरोग्य हे निरोगी कुटुंब आणि समुदायांचा पाया आहे, जे आपल्या सर्वांसाठी आशादायक भविष्य सुनिश्चित करण्यास मदत करत असल्याचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनी यावेळी म्हटले आहे.
यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय परिसरात अधिकारी व कर्मचारी यांनी आरोग्य बाबतची शपथ घेवुन विविध राष्ट्रिय आरोग्य कार्यक्रम व योजनांची जनजागृती करण्यात आली.
दि. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन कार्यक्रम वेळी जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरजंन अग्रवाल,जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी विजय आखाडे,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे,वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास विंचुरकर,प्रशासकीय अधिकारी प्रमोद काळे व शाम लिचडे,जिल्हा लेखा व्यवस्थापक संकेत मोरघरे,जिल्हा आयईसी अधिकारी प्रशांत खरात,जिल्हा समन्वयक डॉ.श्रुती राणा,डॉ.तनया चौधरी,सपना खंडाईत,कल्याणी चौधरी,मंजु रहांगडाले,मनिशा देशमुख,ज्योती सावरकर,भुमेश्वरी देशमुख, संजय दोनोडे,बिसेन,राजेश दोनोडे,राकेश राकडे,डॉ.पंकज पटले,उकदास बिसेन,रविंद्र श्रीवास,पवन फुंडे,पंकज रहांगडाले,दिनेश माकीजा,कैलाश खांडेकर,कैलाश चिचामे,सारनाथ बोरकर,अल्का मिश्रा यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाची कामगिरी केली.