गोंदिया,दि.०८ःःगोंदिया शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले फिर्यादी प्रशांत चुन्नीलाल सारंगपुरे, रा. मालवीय शाळेजवळ, चंद्रशेखर वार्ड गोंदिया यांच्या राहत्या घराचा दि. ६/४/२०२५ चे २३.०० वा. ते दि. ७/४/२०२५ चे ५.४५ वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने समोरील दरवाजा खोलुन घरातील लाकडी आलमारीत ठेवलेले एक सोन्याची नथ, चांदीची एक जोड पायल,नगदी ४७०/- रु.,एक रेडमी कंपनीचा व एक एम.आय. कंपनीचा मोबाईल हँडसेट असा एकूण ३०,४७०/- रु. चा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार नोंदवली होती.त्या तक्रारीच्या आधारे पो.स्टे. गोंदिया शहर येथील डी.बी. पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्हा दाखल होताच गोपनिय खबरेच्या आधारे आरोपी देव प्रकाश बनोटे,वय १९ वर्षे, रा. मालवीय शाळेजवळ, चंद्रशेखर वार्ड गोदिया यास दि.७ एप्रिल रोजी ताब्यात घेवून त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने कसोशीने तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले.त्याच्याकडून गुन्हयात चोरीस गेलेला संपूर्ण मुद्येमाल किंमती एकुण ३०,४७०/-रु. चा हस्तगत करुन आरोपीला अटक करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो. हवा. कवलपालसिंग भाटीया हे करीत आहेत.
सदरची कामगीरी गोरख भामरे, पोलीस अधिक्षक,नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक,श्रीमती रोहीणी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक किशोर पर्वते, डी.बी. पथकाचे पो.हवा. कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, निशिकांत लॉदासे, प्रमोद चव्हाण, दिपक राहांगडाले, सतिश शेंडे, पोशि. सुभाष सोनवाने, दिनेश बिसेन, मुकेश रावते, अशोक राहांगडाले, प्रमोद शेंडे, सोनु नागपुरे, राकेश बंजार यांनी केली आहे.