गोंदिया,दि.०८ः-दवनीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या रायपूर येथील हायस्कूलच्या वर्गखोलीचे दाराचे कुलूप तोडून चोरी करणार्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करीत त्यांच्याकडून साहित्य हस्तगत केला आहे.सविस्तर असे की,लक्ष्मीबाई टेंंभरे हायस्कूल रायपूरचे मुख्याध्यापक भूनेश्वर गेंदलाल बिसेन, राहणार शिवटोला (तांडा) ह. मु. रायपुर, तालुका जिल्हा- गोंदिया यांनी दवनीवाडा पोलिसात दिलेल्या तक्रारीच्या आधारे दिनांक 5/4/2025 चे 12.30 वा. ते दि. 7/4/2025 चे 08.00 वा. दरम्यान अज्ञात चोरट्यानी लक्ष्मीबाई टेभरे हायस्कुल, रायपुर येथील शाळेचे कार्यालयाच्या साठा रूमचे व वर्गखोलीचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून शाळेचे सुरक्षेकामी लावलेले दहुआ कंपनी 02 बुलेट कॅमेरा, डी.वी.आर तसेच तांदुळ 200 किलो, इंडियन गॅस हंडा जर्मन गंजी 3 नग, 10 लिटर सोयाबिन तेल, 14 किलो वटाणा असा एकुण किंमती 15,100/- रू.चा मुद्देमाल चोरून नेले.फिर्यादीचे रिपोर्टवरून पो. स्टे. दवानीवाडा येथे अपराध क्र. 112/2025 कलम 303(2), 331 (4), 305 (इ) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर दवनीवाडा पोलिसांंसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकाने सदर गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देऊन समांतर तपास सुरु केला.तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मनोज तेजु उईके वय 27,आशिक बिरटलाल बागडे वय 26,रा. दोन्ही बलमाटोला ता. जि. गोदिया,सुरज नामदेव नेवारे वय – 30 रा. देवरी ह.मु. रायपुर ता. जि. गोंदिया या तिघांना गुन्ह्याचे अनुषंगाने ताब्यात घेऊन सखोल चौकशी विचारपूस केली असता तिघांनिही चोरी केल्याचे कबूल केले.तिघांनाही गुन्ह्यात अटक करुन त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला संपुर्ण मुद्देमाल साहित्य किंमती 15,100/- रुपयांचे हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहे.आरोपींना पोलीस ठाणे दवानीवाडा पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई तपास प्रक्रिया दवानीवाडा पोलीस करीत आहेत..
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, यांचे निर्देश सूचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथक, म.पो.उप.नि. वनिता सायकर,अंमलदार रियाज शेख, सोमू तूरकर , संतोष केदार, दुर्गेश पाटील, घनश्याम कुंभलवार यांनी कामगिरी बजावली आहे.