गोंदिया,दि.०८- रब्बी धान पीकास नियमित पाणी पुरेल यासाठी १२ तास वीज पुरवठा करण्यात यावा या मागणीला घेऊन मंगळवार (दि. ०८) दुपारी बारा वाजता सोनी,बोटे,दवडीपार,झांजिया,मोहगाव, सर्वाटोला येथील जवळपास २०० शेतकऱ्यांनी वीज वितरण कार्यालय गोरेगाव येथे ठिय्या आंदोलन केले व दिवसा १२ तास वीज पुरवठा करण्यात यावा या आशयाचे निवेदन उपकार्यकारी अभियंता विवेक गजभिये यांना देण्यात आले.
सोनी, बोटे, दवडीपार, झांजिया, मोहगाव ,सर्वाटोला या ग्रामीण भागात ७ एप्रिलपासून रब्बी भात पीकास पाणी देण्यासाठी विज पुरवठा रात्री १० वाजता पासून ते पहाटे चार वाजेपर्यंत म्हणजे ८ तास करण्यात येते. रात्री भारनियमन जास्त असल्यामुळे फेस, डीओ जात राहतो. यामुळे अनेक तास विद्युत पुरवठा बंद राहते. त्यामुळे शेतीला पुरेशी पाणी मिळू शकत नाही. आणि रात्री बेरात्री शेतात जाणे हे धोकादायक आहे त्यामुळे एप्रिल मे महिन्यात दिवसा १२ तास वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे.यावेळी पंचायत समिती सदस्य किशोर पारधी, मोहगाव चे उपसरपंच कमलेश रहांगडाले, सुनील साखरे, दवडीपारचे सरपंच बुगलाल कटरे, झांजिया सरपंच अरुण बिसेन, प्रेमलाल शहारे,राधेश्याम सोनवणे, सतीश हटवार सिताराम पटले तसेच मोठ्या संख्येत शेतकरी बांधव उपस्थित होते.