श्री सूर्यादेव मांडोबाई देवस्थान समिती येथील सामुहिक विवाह समारोह कार्यक्रम दरम्यान आरोग्य सेवा बहाल

0
123

गोरेगाव,दि.१०ः-   चैत्र नवरात्र प्रसंगी मांडोबाई देवस्थान येथे हजारो भाविक हजेरी लावुन पुजा अर्चना करुन जातात. दि.६ एप्रिल 2025 रोजी भव्य विवाह सोहळा कार्यक्रम देवस्थान समिती तर्फे भव्य विवाह सोहळा आयोजन करण्यात आली होती.दरवर्षी प्राथमिक आरोग्य केंद्र तिगावच्या वतीने आरोग्य शिबीर व जनजागृती करण्यात येत असते.
दि. ६ एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकारी प्रजित नायर व गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार श्री सूर्यादेव मांडोबाई देवस्थान समिती बघेडा येथे सामूहिक विवाह समारोह कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमादरम्यान उपस्थित असणाऱ्या लोकांना आरोग्य सेवा मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्राथमिक आरोग्य केंद्र तिगाव, चोपा व तिल्ली मोहगाव यांच्या एकत्रित सहकार्याने आरोग्य सेवा पुरविण्यात आली तसेच जवळच्या आरोग्य संस्थेत ठिकाणी उष्माघात कक्ष तयार करण्यात आले होते जेणेकरून उष्माघात लक्षणे रुग्णांना त्वरित जवळच्या आरोग्य संस्थेत संदर्भित करुन उपचार देण्यात आल्याची माहिती गोरेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी यावेळी दिली आहे. सामूहिक विवाह समारोह कार्यक्रम दिवशी आरोग्य संस्थेमार्फत आरोग्य प्रदर्शनी व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. किरकोळ आजाराच्या रुग्णांना प्रथमोपचार करण्यात आले तर आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारे राष्ट्रिय आरोग्य कार्यक्रम, विविध योजनंची प्रचार व प्रसिद्धि आरोग्य कर्मचार्यामार्फत करण्यात आली.सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनी सामूहिक विवाह समारोह कार्यक्रम स्थळी भेट देवुन आरोग्य सेवेची पाह्णी केली.
दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी सकाळ पाळीत प्राथमिक आरोग्य केंद्र तिगाव अंतर्गत आरोग्य चमुत वैद्यकीय अधिकारी डॉ.ऋतिक यादव,समुदाय आरोग्य अधिकारी मयुरी शिवणकर,आरोग्य सेविका व्ही.आय.गजभिये,आरोग्य सेवक आर.पी.राणे व आशा सेविका सुनीता भावे तर दुपार पाळीत वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल सेवईवार,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत बिसेन,आरोग्य सेविका एस.बी.सोरले,आरोग्य सेवक जी.आर.खेवले,आशा सेविका डीलेश्वरी वटी,वाहन चालक भेशमनजी शिवणकर यांनी आरोग्य सेवा दिल्याची माहिती वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रेमकुमार बघेले यांनी दिली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रा चोप्रा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ.रोहित गोखे,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.यामेष भगत, आरोग्य सेवक रणजीत बोरकर,आरोग्य सेविका सोफिया शामकुवर व आशा सेविका ललिता कावळे यांनी वैद्यकीय सेवा दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्र तील्ली मोहगाव अंतर्गत डॉ.मीनल कुमार कुर्वे,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.प्रीतमलाल डहाके, आरोग्य सेवक मनोजकुमार टेंभुर्णे,आरोग्य सेविका नूतन कठाने,आशा सेविका वंदना सांगोळकर यांनी वैद्यकीय सेवा दिली.