अर्जुनी मोरगाव,दि.१०ः-जागतिक आरोग्य दिवस 7 एप्रिलच्या अनुशंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव व
सशस्त्र दूरक्षेत्र पोलीस ठाणे गोठणगावच्या सहकार्याने अतिदुर्गम जंगलव्याप्त ग्राम गंधारी येथे दादालोरा खिडकी योजनेंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मोरगाव अर्जुनी तालुक्यातील घनदाट जंगलव्याप्त म्ह्णुन गंधारी गाव प्रसिद्ध आहे. तेथील नागरिकांना आरोग्याच्या मुलभुत सुविधा मिळ्ण्याच्या दृष्टीकोनातुन जागतिक आरोग्य दिवस 7 एप्रिलच्या अनुशंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.देवेंद्र घरतकर व डॉ.स्नेहल गायकवाड तसेच सशस्त्र दूरक्षेत्र पोलीस ठाणे गोठणगावच्या वतीने पोलीस उपनिरिक्षक शुभम नवले व गिते यांच्या सामुहिक प्रयत्नाने गंधारी येथे आरोग्य शिबीर संपन्न झाले. शिबीरादरम्यान १०२ लोकांची तपासणी निदान व औषधोपचार करण्यात आले .त्यासोबत 13 रुग्णांची ईसीजी,58 रुग्णांची अंसासर्गिक कार्यक्रम अंतर्गत रक्तदाब व मधुमेह तपासणी,32 रुग्णाची प्रयोगशाळा रक्त तपासणी, ३९ रुग्णाची मोतीबिंदू व दंत तपासणी तपासणी करण्यात आल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहल गायकवाड यांनी दिली आहे.
आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र गोठ्णगावचे आरोग्य सहाय्यक संतोष पारधी व किशोर कुर्वे, फार्मासिस्ट मुकुल बडवाईक, आरोग्य सेवक अमोल मालेकर,आरोग्य सेविका प्रमिला रॉय,स्टाफ ब्रदर चिरायु वावरे यांचे सोबत फुलचंद चौधरी, आशा सेविका साधना कोडापे, अहिल्या इस्कापे,ओमिता पुराम यांनी आरोग्य सेवा दिली.दंत तपासणी डॉ.भांडारकर व नेत्र तपासणी डॉ.रेमिडिज व डॉ.परशुरामकर यांनी केली.तर शिबीरा दरम्यान एच.एल.एल.महालँबचे नेहा कापगते यांनी सिकलसेल व सि.बी.सी,कोलेस्ट्रॉंल, एच.डी.एल, एल.डी.एल.,लिपिड प्रोफाइल महालॅब च्या वतीने विविध प्रयोगशाळा तपासणी रक्त तपासणी व समुपदेशन करण्यात आले. अरविंद उके यांनी नोंदणी व वैद्यकिय अधिकारी डॉ.स्नेहल गायकवाड यांनी असंसर्गजन्य आजाराविषयी मार्गदर्शन व समुपदेशन केले.
सशस्त्र दूरक्षेत्र पोलीस ठाणे गोठणगावच्या वतीने पोलीस उपनिरिक्षक शुभम नवले,गिते व यादव,पोलीस हवालदार सतीश भोवते,पोलीस नाईक कमलेश अलविंद वालदे,पोलिस हवालदार थेर,पोलिस शिपाई मेश्राम यांनी आरोग्य तपासणी शिबीर यशस्वीसाठी सहकार्य केले.