संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी जेलभरो आंदोलन

0
27

गोंदिया,दि.१०: भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा(OBC) वर्ग मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, संविधान मैत्री संघ, नॅशनल नेटवर्क ऑफ बुद्धिस्ट युथ व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया समोर सभेचे आयोजन तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन, गोंदिया येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले. या देशव्यापी जेलभरो आंदोलनात ईव्हीएम काढून टाकून आणि मतपत्रिकेचा वापर करून निवडणुका घ्याव्यात, जनगणना आणि ओबीसीची जातीनिहाय जनगणना करावी, संसदेत आरएसएस आणि भाजपाकडून स्थानिक बहुजन महापुरुषांच्या अपमानाच्या निषेध, बौद्धगयातील महाबोधी महावीहाराची मुक्ती, वक्फ बोर्ड संशोधन विधेयक 2025 च्या विरोधात या मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन करण्यात आले. या जेलभरो आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अनंत शिरसाट, अरविंद शेंडे, धनीराम बरीयेकर, दिनेश हुकरे, राजू कामत, हरिश कोहळे, सतीता जांबुळकर, माया हिरकणे, धनलालजी कुंभरे, जितू सहारे, जयशिला परतेती, लता उके, हंसकला गणवीर, वंदना डोंगरे, नागदेवे सर, बनसोड सर, वर्षा शेंडे, शालिनी बोरकर, शालिनी मेश्राम, चंद्रमा फुलझेले, मधुकर मेश्राम, परमानंद मेश्राम, प्रमिला कडबे, करुणा तिरपुडे, सुजाता बागडे, अरुणा चव्हाण, सुधीर रंगारी, प्रतिमा रामटेके, रीता उईके, प्रवीण रंगारी, पल्लवी मडावी, पंचफुला शिवणकर, रमेश कनोजे, भाग्यवान फुल्लुके, वर्षा फुल्लुके, अक्षय डोंगरे, विनय मेश्राम, सुभाष टेंभुरकर आदींनी आपली उपस्थिती दर्शविली. तर कार्यक्रमाचे संचालन विणय लिल्हारे, प्रस्तावना करुणा कामत तर आभार पौर्णिमा जनबंधू यांनी केले.