मुंबई विद्यापीठास अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य व काय पदक

0
11

६९ की. व ४७ की. वजन गटांमध्ये कुमारी प्रेरणा साळवी रौप्य पदक व कुमारी शिफा शेख यांची कास्य पदकाची कामगिरी

मुंबई, १० एप्रिलः काश्मीर विद्यापीठ, श्रीनगर येथे ४ ते ७ एप्रिल २०२५ दरम्यान आयोजित केलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य व कांस्य पदकाचा बहुमान मिळवला आहे. ६९ की. वजन गटात मुंबई विद्यापीठाच्या कुमारी प्रेरणा साळवी या विद्यार्थींनीने ५०० कीलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले. तर ४७ की. वजन गटात कुमारी शिफा शेख हिने ३५७.५ किलो वजन उचलून कास्य पदक पटकावले. या यशामुळे मुंबई विद्यापीठाचा क्रीडा क्षेत्रातील झेंडा उंचावला आहे.

भारतीय विद्यापीठ संघाच्या वतीने आयोजित या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत भारतातील १५० विद्यापीठाने स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाकडून विविध गटांमध्ये १४ खेळाडूंनी सहभाग घेतला. प्रशिक्षक सुरेश चेडे, रविंद्रनाथ गायकर आणि मोहनीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने हे यश मिळविले या विद्यार्थीनीच्या विजयाबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आणि क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांनी अभिनंदन करून भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या.