सडक अर्जुनी- तालुक्यातील खोडशिवणी येथील ग्रामपंचायतीला संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानात तालुक्यात प्रथम आल्याने जिल्हास्तरीय तपासणी समितीने नुकतीच या ग्रामपंचायतीची तपासणी केली. तपासणीत गावातील व्यक्तीला शौचालय, पिण्याचे पाणी, शाळेची तपासणी अशा अनेक बाबतीत गावाची पाहणी केली. या जिल्हास्तरीय तपासणीत अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी खोटेले, स्वच्छता विभागाचे भागचंद रहांगडाले आणि इतर समिती सदस्य उपस्थित होते. सरपंच गंगाधर परशुरामकर, उपसरपंच सत्यवान नेवारे, पंचायत समिती सदस्य आर. बी. वाढई आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सोसायटीचे अध्यक्ष उद्धव परशुरामकर, ग्रामपंचायत अधिकारी ओमेश कापगते, शाळेतील सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका व गावकरी उपस्थित होते.