गोंदिया,दि.११ः-जिल्ह्यातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर देवरी तालुक्यातील शिरपूर येथे असलेल्या परिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाका(आरटीओ) येथे कुठलेही कारण नसतांना ट्रेलरचालकाला ५०० रुपयाची एन्ट्री द्यावे लागेल असे सांगून तक्रारदारास लाचेची मागणी करुन खासगी इसमाच्या माध्यमातून स्विकारल्याने नागपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नागपूर ग्रामीण येथील मोटार वाहन निरिक्षक योगेश गोविंद खैरनार(वय ४६) यांच्यासह खासगी इसम नरेंद्र मोहनलाल गडपायले(वय ६३ रा.मरारटोली,आझाद वार्ड,गोंदिया) व आश्लेष विनायक पाचपोर (वय ४५,खासगी ड्रायव्हर,शासकीय पाॅलिटेक्निक काॅलेजच्या समोर गाडगेबाबा मंदिराच्या मागे,गाडगेनगर अमरावती)यांच्याविरुध्द आज ११ एप्रिल रोजी लाच स्विकारल्याप्रकरणी अटक करुन देवरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाही सुरु करण्यात आली आहे.
सविस्तर असे की ३२ वर्षीय तक्रारदार यांचे मालवाहतुकीचे ट्रेलर हे भंडारा-देवरी मार्ग रायपूरकडे जात असतांना शिरपूर येथील आरटीओ चेकपोस्ट येथे काहीही कारण नसतांना ५०० रुपयाची मागणी करुन एन्ट्री द्यावे लागेल असे सांगून ५०० रुपये खासगी इसम नरेंद्र गडपायले यांनी स्विकारुन ती रक्कम खासगी इसम आश्र्लेष पाचपोर यांच्या स्वाधीन केली.खासगी इसम पाचपोर याने ती लाचेची रक्कम असल्याची जाणीव असतानाही स्विकारुन आपल्या ताब्यात ठेवली.तसेच आरोपी लोकसेवक यांना प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर ग्रामीण यांच्या २८ मार्च २०२५च्या आदेशानव्ये येथे नेमलेले असताना नागपूर प्रादेशिक ग्रामीण परिवहन अधिकारी यांच्या मौखिक आदेशाने सीमा तपासणी नाका शिरपूर येथे हजर राहून बेकायदेशीरपणे आरोपी खासगी इसम यांना नेमूण मुंबई कोलकात्ता महामार्गाने जाणार्या मालवाहू वाहनचालकांकडून एन्ट्रीच्या नावावर खासगी इसमामार्फेत लाचेची मागणी करुन ती स्विकारल्याने नाशिक लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी पोलीस निरिक्षक संदिप घुगे तसेच पथकातील पोलीस हवालदार गणेश निंबाळकर व शिपाई नितिन नेटारे यांनी ही कारवाई केली.