अर्जुनी मोरगाव तालुक्यात वादळ व अवकाळी पावसामुळे हजारो एकर मका पीक जमीनदोस्त

0
97

– शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची माग )

अर्जुनी मोरगाव-तालुक्यात 10 एप्रिल 2024 रोजी आलेल्या अवकाळी पाऊस व वादळवाऱ्यामुळे हजारो एकर क्षेत्रातील मका पीक जमीनदोस्त झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून, त्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मका पिकाची लागवड केली आहे. मका हे तुलनेत कमी खर्चात उत्पादन देणारे व बाजारात मागणी असलेले पीक असल्यामुळे शेतकऱ्यांचा यावर्षी मका पिकांकडे कल वाढला होता. सध्या मका काढणीच्या स्थितीत असताना अचानक आलेल्या वादळी पावसामुळे हातात आलेले पीक वाया गेले आहे.

या नुकसानीमुळे तालुक्यातील अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी मका उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित यंत्रणेमार्फत तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या वर्षी मका उत्पादन समाधानकारक होते.परंतु अवकाळी पाऊस व वादळ वा-यामुळे कापनीला आलेले पिक परिपक्व होण्याचे पूर्वीच पुर्णता: कोसळले.आहे.त्या अपरिपक्वतेमुळे मका वजनाला हलका होणार मका तोडाईला डबल मजुराचा खर्च येणार आहे.त्यामुळे मका उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे.शासनाने व संबधित यंत्रणेने त्वरीत पंचनामे करुन नुकसानग्रस्त मका उत्पादक शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी.
प्रगतशील शेतकरी
यादोराव बोरकर बोंडगावदेवी*