गोंदिया:- राज्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्ज माफी, शेतमालाला हमीभाव यासह इतर मागण्यांना घेऊन ११ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तिरोडा गोरेगावचे विजय रहांगडाले, आमगाव-देवरीचे आमदार संजय पुराम यांच्या घरापुढे प्रहारचे कार्यकर्ते व शेतक-यांनी मशाल आंदोलन केले. तिरोडा येथील शहीद गोवारी स्मारक समाज भवन या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्ते व शेतकरी एकत्रित झाले व रात्री ९.३० वाजता मशाल घेऊन तिरोडा शहरातील मुख्य रस्त्या वरून फिरत चंद्रभागा मार्गावर आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते घोषणा देत संपूर्ण शेतकरी कर्जमाफी सात/बारा कोरा करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या निवडणूक काळातील घोषणा ची आठवण करून देण्यात आली. तसेच शेतमालाला हमी भाव सरकार देऊ शकत नाही म्हणून पेरणी ते कापनी व मळणी चे कामे महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत करण्यात यावे, इतर राज्यात दिव्यांग बांधवांना त्याचा अल्प मानधनात भागत नाही करीता जास्त मांनधन दिले जाते.म्हणून महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवांना सहा हजार मानधनात वाढ करावी, भूमिहीन मजुर अकस्मात दुर्घटना झाली तर एकही योजना नाही आहे म्हणून भुमिहीन शेतमजूर ला गोपीनाथ मुंडे योजना च्या धर्तीवर शेतमजूर कुटुंबाला विमा सुरक्षा कवच द्या आदी मागण्या करण्यात आल्या. नंतर मोर्चा तिरोडाचे आमदार विजय रहांगडाले यांच्या घरी पोहोचला. तेव्हा आमदार घरी नसल्याने त्याच्याशी फोनवर आपल्या मागण्याबाबत चर्चा करुन आमदारांचे प्रतिनिधी म्हणून तिरोडा भाजप शहर अध्यक्ष स्वानंद पारधी यांनी त्यांचा निवेदन स्वीकारले.त्याचप्रमाणे आमगाव-देवरीचे आमदार संजय पुराम यांच्या पुराडा निवासस्थानी आमदारांच्या पत्नी सविता पुराम यांनी निवेदन स्विकारले.
हे आंदोलन प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर,जिल्हा सचिव महेंद्र नंदागवळी,तिरोडा तालुका अध्यक्ष प्रदीप निशाने,पंचायत समिती सदस्य सौ.वनिताताई भांडारकर,गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष रतन खुळसिगे,गोपीळ शेन्डे ,रवि फुलझले, गुड्डू सोनवणे,शुभम आदमने, रुपेश वासनिक,आशिष आदमने सुदाम मेश्राम,राजू मेहर उपसरपंच, नरेश ठवक्कर,नारायण खगार उरकुडा उके रवि भांडारकर अन्य कार्यकर्ते शेतकरी भुमिहीन शेतमजूर दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने स्वंयस्फूर्तीने सहभागी झाले.