उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू,मुलांचे छत्र हरवले

0
153

गोंदिया : ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे उपचार घेत असताना मृतक शालिनी विनायक राऊत (37) राहणार कोहलगाव हिची प्राणजोत मालवली. तिच्या मागे तीन मुली असून ती विधवा होती. काही वर्षांपूर्वीच तिच्या पतीचे मृत्यू झाले असून ती एकटीच आपल्या मुलींचे पालन पोषण करताना तिच्या पोटात दुखापतीच्या कारणाने काही महिन्यांपूर्वी त्यावर केटीएस सामान्य रुग्णालय गोंदिया येथे शस्त्रक्रिया देखील झाली होती अशी माहिती आहे. अशा परिस्थितीत मृतक शालिनी ही तिच्या मोठ्या बहिणीकडे तालुक्यातीलच ग्राम शिरोली येथे दीड महिन्यापासून राहत होती. या दरम्यान असे काय घडले की दिनांक दहा एप्रिल रोजी तिला ग्रामीण रुग्णालय मोरगाव अर्जुनी येथे आणण्यात आले व 11 तारखेला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यादरम्यान परिसरात शंका कुशंकाना उधाण आले आहे. छोट्या छकुल्या तिन्ही मुलींच्या डोक्यावरून माय बापाचे छत्र हरपल्यामुळे परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. डॉक्टरांनी शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांकडे सोपविले. या घटनेची दखल घेत मोरगाव अर्जुनी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सपोनी शेंडे करीत आहेत.