मुंबई, दि.12 (प्रतिनिधी) बिहार राज्यातील प्राचीन आणि पवित्र बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संपूर्ण देशात पेटले असतानाच संसदेत ही त्याचे तीव्र पडसाद उमटले, महाबोधी विहार मुक्तीसाठी त्याचा ताबा बौद्धांकडे देण्यात यावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी बौद्ध भिखु ची धम्मदीक्षा घेऊन आत्मदहन करण्याचा इशारा बिहार आणि केंद्र सरकारला पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार भारतीय 1949 कायद्यामध्ये सुधारणा करून नऊ जणांच्या कमिटीमध्ये पाच हिंदू आणि चार बौद्ध अशी सदस्य संख्या असल्याने त्या सर्व कमिटीवर ब्राह्मण धर्मीयांचा कब्जा आहे, त्यामुळे या पवित्र जगामध्ये मांडल्या जाणाऱ्या प्राचीन स्थळांमध्ये काही अनुचित घटना घडवून त्याचे पावित्र्य भंग होत आहे, ही बाब अत्यंत खेदजनक असून बौद्ध धर्मीयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत, महाराष्ट्र बिहार आणि दिल्ली मध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी हजारो लाखोंचे मोर्चे निघत असताना बिहार सरकार आणि केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे गंभीर बाब असून त्यासाठी पूजनिय भंन्तेगण यांच्याकडून भिखु दीक्षा घेऊनea आत्मदहन करणार असल्याचा इशारा डॉ. राजन मकणीकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे.
जन्म आई वडिलांनी दिला असला तरि खातो तो घास आणी घेतो तो स्वास केवळ बाबासाहेब आंबेडकरामुळेच… संसार नाती गोती हा भ्रम आहे, संसार म्हणजे मोह माया आणी मतलब. बुद्ध हे वास्तव आहे. त्यामुळे ग्रहस्त जीवन त्यागून आत्मदहन आंदोलनातून वाचून राहिलो तर आपण बुद्धाच्या चरणी राहून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बुद्ध धम्म आणी संघाचा प्रचार आणी प्रसार करत आयुष्य व्यतीत करणार असल्याचेहीं त्यांनी सांगितले.