एम.जी.पॅरामेडिकल काॅलेजात महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तके आणि दुर्मिळ ग्रंथ साहित्यांचे प्रदर्शन

0
114

गोंदिया,दि.१३. शहरातील एम.जी. पैरामेडिकल कॉलेज चन्द्रशेखर वार्ड येथे २०० हून अधिक पुस्तक,ग्रंथ,दुर्मिळ लेख,साहित्यासह ग्रंथसंपदेचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.विशेष म्हणजे ही सर्व दुर्मिळ पत्रे लेख आणि दस्तऐवजांचे जतन व संवर्धन करण्यात आले आहेत.तसेच 18 तास अभ्यासच्या या नाविण्यपूर्ण 3 दिवसीय उपक्रमामध्ये हिरहरीने भाग घेवून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचे पुस्तकांचे वाचन विद्यार्थी करित आहेत.
एम जी पैरामेडिकल कॉलेजमध्ये 12 एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ या दरम्यान महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंती सप्ताहाच्या पहिल्या दिवशी दुर्मिळ पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन माजी उपशिक्षण अधिकारी डी.एस. मेश्राम आणि नुतन विद्यालयाचे माजी प्राचार्य वाय.पी. बोरकर, सर्वे आॅफ इंडियाचे गौतम गजभीये, प.पू. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती गोंदिया उपाध्यक्ष श्रीमती श्लेषा लाडे यांच्या हस्ते करण्यात आले,तसेच याप्रसंगी गोंदिया जिल्ह्यातुन प्रथमच महिला कु. स्नेहा मेश्राम यांची न्यायधिश पदाकरिता निवड झाल्याने एम जी पैरामेडिकल कॉलेज तर्फे त्यांचा सत्कार मन्सरबाई गोंडाने यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून करण्यात आले.यावेळी स्नेहा मेश्राम यांनी विद्याथ्र्यांना अभ्यास कसे करावे त्यांचे नियोजन बद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच वाय.पी. बोरकर यांनी सांगितले की 18 तास अभ्यास हा उपक्रम अत्यंत चांगला असुन विद्याथ्र्यांनी थोर पुरूषांची प्रेरणा घेवून आपले पुढचे भविष्य साकार करण्याच्या शुभेच्छा दिले.
संयुक्त जयंती सप्ताहाच्या उदघाटन सोहळ्याप्रसंगी माजी उपशिक्षण अधिकारी डी.एस. मेश्राम यांचे ष्भारतीय संविधान निर्मितीचे ५५ वर्षे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान या विषयावर व्याख्यान केले. एम जी पैरामेडिकल कॉलेज मार्फत आयोजित या 3 दिवसीय संयुक्त जयंती सप्ताहामध्ये कालावधीत विविध कार्यक्रमए परिसंवादए व्याख्यानए पुस्तक प्रदर्शन. प्रदीर्घ वाचन. गीत गायन स्पर्धाए पत्रलेखन स्पर्धा. महामानवांचा शाहिरी जलसा. स्थळ भेट आणि संविधान गौरव यात्रा अशा अनुषंगिक कार्यक्रमांचे नियोजन कॉलेजमार्फत करण्यात आले आहे.
कार्यकम्राचा सूत्रसंचालन विध्यार्थी प्रतीनिधी कु. पलक टेंभरे व कु. स्वाती खोटेले यांनी व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. प्रिती वैद्य यांनी केले. कार्यक्रमाला काॅलेजचे संचालक अनिल गोंडाने, प्राचार्या. अनुसया लिल्हारे, प्रा. प्रिती वैद्य, प्रा. छाया राणा, प्रा. रामेश्वरी पटले, प्रा. आरती चैधरी, प्रा. मनीष चैधरी, प्रा. गायत्री बावनकर, डाॅ. समयेक गणवीर, प्रा. आकाश सोरते, श्री राजू रहांगडाले, श्री सौरभ बघेले, श्री राजाभाऊ उंदिरवाडे, श्रीमती श्लेषा लाडे, श्रीमती योगेश्वरी ठवरे व श्रीमती रूपाली धमगाये हे सर्व कर्मचारी व विद्यार्थीगण उपस्थित होते. या कार्यक्रमाला यशसवी करण्यासाठी यश रामटेके, शुभम पडारे, मेघांश बिसेन, शुभम बोरकर, तुषार बोपचे, रोहित बागडे, कु. पलक टेंभरे, कु. दिव्यंका बन्सोड, ईशा नेवारे, चेतना ब्राम्हणकर, सौरभ लिल्हारे यांनी प्रयत्न केले.