अर्जुनी-मोर. –आपन जनतेचे सेवक आहोत.लोकप्रतिनिधींना मोठे करण्याचे काम मतदार बंधु आणि भगिणींकडून होत असते.सुरवातीपासूनच आपले कार्य जनसेवेसाठी समर्पित केले आहे.बोंडगावदेवी जि.प.क्षेत्राच्या विकासासोबतच आपल्यावर संपुर्ण गोंदिया जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी आली आहे.शेवटचा माणुस हाच आपल्या विकासाचा केंद्रबिंदू मानून आता थांबायचं नाही.केवळ जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाचा ध्यास मनातून ठेवायचा असा विश्वास जि.प.चे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी व्यक्त केले.
ते बोंडगाव देवी व इंजोरी या ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकासकामांचे भूमिपूजन दि.12 रोजी करण्यात आले,त्याप्रसंगी बोलत होते.बोंडगाव देवी येथे 50 लाख रुपये तर इंजोरी येथे 5 लाख रुपये किंमतीच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.या कामांमध्ये गंगा जमुना माता मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसविणे, तलावावर पाणघाटाची निर्मिती, गावातील अंतर्गत सिमेंट रस्त्यांचे बांधकाम, शाळेच्या आवाराला संरक्षण भिंतीचे बांधकाम अशा विविध मूलभूत सुविधा पुरविणाऱ्या कामांचा समावेश आहे.
या भूमिपूजन सोहळ्याला प्रामुख्याने उपसभापती संदीप कापगते, सरपंच प्रतिभाताई बोरकर चान्ना चे सरपंच, सचिन डोंगरे ,रवींद्र खोटेले, रत्नाकर बोरकर, राधेश्याम झोडे, श्यामकां नेवारे, श्रीकांत बनपूरकर, लैलेस्वर शिवणकर, अमरचंद ठवरे, माधुरीताई गोंधळे, विशाखाताई मेश्राम, उषाताई पुस्तोडे, सरिताताई नेवारे, मोरेश्वरजी मेश्राम, दीपिकाताई रहिले, डाकराम मेंढे, रोकडे सर, लंजे सर, दिलीप हुकरे, कैलास हांडगे, परमार, सचिन नाकाडे, गोपीचंद राजगिरे, गुड्डूजी डोंगरवार, रेखाताई बारसागडे, अनिकेत डोंगरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.