डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व भगवान बुद्ध मूर्ती अनावरण सोहळा उत्साहात संपन्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन
अर्जुनी-मोर,दि.१४ एप्रिल- आनंद बुद्ध विहार समिती बाकटी यांच्या वतीने भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व भगवान बुद्ध मूर्तीची प्रतिस्थापना व अनावरण सोहळा उत्साहात व धर्मभावनेने पार पडला. यावेळी गावातील नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून मंजूर 10 लक्ष रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन ही करण्यात आले.
याप्रसंगी आमदार राजकुमार बडोले यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की, बाबासाहेब डॉ. आंबेडकर हे भारताच्या सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार होते. त्यांनी दलित, वंचित, शोषित घटकांना शिक्षण व हक्कांचे शस्त्र दिले. आज आपण त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सामाजिक एकता व समता प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेला संदेश शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा आजच्या काळात अधिक प्रासंगिक आहे. अशा शब्दांत त्यांनी बाबासाहेबांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, मुर्तीदाते डॉ. मुकुंद बोरकर, पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार, भन्ते शिलानंदजी, भन्ते डॉ. धम्मज्योती भन्ते, भन्ते बोधीजी, माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रचना गहाणे, पंचायत समिती सदस्या पुष्पलता दृगकर , सरपंच सरीताताई राजगिरे, उपसरपंच गुलशन सांगोडे, रतन बडवाईक पोलिस पाटील कपिल मेश्राम अध्यक्ष तंटामुक्त समिती , माजी प्राचार्य हेमंत राजगीरे म, राजहंस ढोके, प्रमोद मेश्राम, प्रशांत शहारे, हितेष डोंगरे, सुभाष मेश्राम, लोकेश सागोळे, अजय देशपांडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.