अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई भारताचे नवे सरन्यायाधीश

0
545

अमरावती:-अमरावतीचे सुपूत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई 14 मे रोजी भारताच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. भूषण गवई हे भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना राष्ट्रपती भवनात भारताच्या सरन्यायाधीशपदाची शपथ देतील.

मिळालेल्या माहितीनुसार, भारताचे विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना लवकरच निवृत्त होणार आहेत. त्यावेळी नवे सरन्यायाधीश कोण असतील याबाबत बरीच उत्सुकता होती. ज्यावर आता निर्णय घेण्यात आला आहे. भारताच्या नव्या सरन्यायाधीशपदावर भूषण गवई असतील. भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात अनेक चांगल्या गोष्टी सुरू केल्या आहेत. त्यांनी जनहित याचिकेच्या सुनावणीसाठी आठवड्यातील एक दिवस निश्चित केला आहे. सर्वसामान्यांसाठीही त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण आदेश पारित केले. यासोबतच उत्तर प्रदेशातील आरोपींच्या घरांवर बुलढोझर चालविण्याच्या कारवाईवरुन त्यांनी सरकारला फटकारलं होतं. न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात 24 नोव्हेंबर 1960 मध्ये झाला. मुंबईत विधीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1985 मध्ये वकिलीची सुरुवात केली. करिअरच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी मुंबई आणि अमरावतीमध्ये काम केलं.

त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजा ए. भोसले यांच्यासोबत काम केलं. ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीशही बनले. काही काळानंतर त्यांची पदोन्नती झाली. ते 24 मे 2019 ला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. आता 14 मे 2025 रोजी ते सरन्यायाशीधपदाची शपथ घेतली. ते सहा महिन्यांसाठी या पदावर असतील, त्यानंतर 23 नोव्हेंबर 2025 ला निवृत्त होतील. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात अनेक गोष्टी सुरू केल्या. त्यांनी जनहित याचिकेसाठी आठवड्याचा एक दिवस निश्चित केला. त्यांनी उत्तर प्रदेश सरकारला बुलढोझर कारवाईवरुन फटकारलं. सर्वोच्च न्यायालयात वकील न्यायमूर्तींसमोर मोठ्या आवाजात बोलत होते. त्यांनी यावर आक्षेप नोंदवला आणि वकिलांना कडक शब्दात फटकारलं. ते नागपूर बार असोसिएशनचे तिसरे सदस्य आहेत, जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले. यापूर्वी न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला आणि न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे सरन्यायाधीश झाले होते.