पुणे,दिनांक १४ एप्रिल २०२५:-जगातील सर्वात मोठा लोकशाहीप्रणित देशाच्या घटनेचे शिल्पकार, बोधीसत्व, तर्कशास्त्रज्ञ, क्रांतीसूर्य, विश्वरत्न, युगपुरूष, कायदेपंडित महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त बहुजन समाज पक्षाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी, माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांच्या नेतृत्वात वाजतगाजत, ढोलताशांच्या गजरात पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आली. ‘भीमोत्सवा’मुळे वातावरण ‘भीममय’ झाले होते.
पुणे जिल्हा अध्यक्ष अशोक दादा गायकवाड यांच्यासह प्रवीण वाकोडे, पी.आर गायकवाड, महेश जगताप (महाराज), शीतलताई गायकवाड, रविंद्र चांदने,परशुराम आरुणे, प्रभाकर खरात, राम डावकर, दीपक भालेराव, शफी भाई, अनिल त्रिपाठी , मुकेश शेलार, भोलाराम जैस्वार, नितेश गायसमुद्रे, बाळासाहेब हातागळे, सिद्धार्थ कांबळे , आकाश डावकर, क्रांती कुमार दणाणे, सुधीर कांबळे, मनोज कसबे, संतोष भोसले, शिवाजी वाघमारे, सी.एन. शिंदे, संतोष शिंदे, संतोष सोनोने, अनिल सरोदे, रमेश गायकवाड, सुजित जैस्वार, संदिप कांबळे, अशोक जैस्वार, नवीन वानखेडे, गंगावणे साहेब तसेच इतर पदाधिकारी, हितचिंतक आणि कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना डॉ.चलवादी म्हणाले की, डॉ.बाबासाहेबांचे विचार समाजाला दिशा देणारे होते, आहेत आणि राहतील. बाबासाहेबांच्या समतामूलक विचारांमुळेच शेकडो कुळांचा उद्धार झाला. महामानवाचे विचार आम्हच्या साठी अमृत फळाहून अधिक महत्वाचे आहे. सामाजिक न्याय, बंधुता आणि समतेचा विचार बहुजन समाज पक्ष सातत्याने पुढे नेते आहेत.बाबासाहेबांनी दिलेली त्रिसुत्री ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, या तत्वांना धरून आजही बसपा समाज परिवर्तनाच्या लढ्यात अग्रस्थानी आहे.
डॉ.बाबसाहेबांच्या विचारांवर चालत मान्यवर कांशीराम जी आणि सुश्री बहन मायावतीजींनी बहुजन समाजाला सत्तेच्या शिखरापर्यंत पोहचवले. त्यांचे हेच कार्य पुढे नेण्याची जबाबदारी आता नव्या पिढीवर आहे.शोषित, पीडित,वंचित, उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हेच पक्षाचे मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन यावेळी डॉ.चलवादी यांनी केले.
अन्याय,अत्याचार मुक्त होत बहुजन समाजाला सत्ताधारी वर्ग बनवण्यासाठी देशातील कोट्यवधी दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय तसेच इतर उपेक्षित घटकांनी बीएसपी सोबत येत आंबेडकरवादी बनण्याचे आवाहन, सुश्री बहन मायावती जी यांनी केले. ‘मेरा भारत महान’ आणि ‘विकसित भारत’ चे स्वप्न पुर्ण करण्यासाठी देशातील सर्व राज्य सरकार तसेच केंद्र सरकारला जातीयवादी तसेच संकुचित राजकीय स्वार्थाचा त्याग करीत ‘संविधानवादी’ बनण्याचे आवाहन सुश्री बहनजींनी यानिमित्ताने केल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.संविधानवादी बनवून व्यापक लोकहित तसेच देशहित संभव आहे. जातिवादातून मुक्त होण्यासाठी समतामुलक भारताची निर्मिती शक्य असल्याचे पुढे बोलतांना डॉ.चलवादी म्हणाले.
……