धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी सुविधा केंद्र सौ. वर्षा पटेल यांच्या हस्ते उद्घाटन

0
67

गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (रातूमनावि) सहकार्याने १५ एप्रिल रोजी विद्यार्थी सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले या केंद्राचे उद्घाटन स्वर्गीय मनोहर भाई पटेल आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पन व दीप प्रज्वलन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी गोंदिया एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा वर्षा पटेल, माजी आ. राजेंद्र जैन, जीईएसचे संचालक निखिल जैन, डॉ. संजय कवीश्वर, डॉ. समय बन्सोड, डॉ. नीलकंठ लंजे, प्रथमेश फुलेकर, मनीष वंजारी, अ‍ॅड. वसंत चुटे, प्राचार्य डॉ. अंजन नायडू तसेच कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. दिलीप चौधरी उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ. अंजन नायडू यांनी अतिथीचे स्वागत पुष्पगुच्छाने करून मान्यवरांच्या परिचय करून दिला. तत्पश्चात महाविद्यालयाला विद्यार्थी सुविधा केंद्र दिल्याबद्दल नागपूर विद्यापीठाला धन्यवाद दिले. त्यानंतर प्रास्ताविक भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आपले विचार व्यक्त केले. जीइएस च्या अध्यक्षा वर्षा पटेल यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. संजय कवीश्वर अधिष्ठाता वाणिज्य व व्यवस्थापन विभाग यांनी आपले विचार व्यक्त करतांना विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्र, त्यांच्या समस्या, नवीन योजनांची माहिती सांगितले त्यासाठी विविध अ‍ॅप आणण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. डॉ. नीलकंठ लंजे सदस्य व्यवस्थापन परिषद यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की नागपूर विद्यापीठाने धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात सुविधा केंद्र सुरु होण्याबद्दल प्राचार्याना अभिनंदन करून हे सुविधा केंद्र सुरु करणे हा विद्यापीठाच्या उत्तम उपक्रम आहे असे म्हटले. यामुळे जे विद्यार्थी नागपूरपासून खूप लांब राहतात त्यांना केंद्रामुळे सुविधा होईल व त्यांच्या खर्च व वेळ वाचेल या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रमांचे प्रमाणपत्र सहज उपलब्ध होऊ शकतात. मनीष वंजारी सिनेट सदस्य यांनी धोटे बंधू महाविद्यालयातील विद्यार्थी सुविधा केंद्राचे महत्त्व सांगितले. डॉ. समय बनसोड व्यवस्थापन परिषद सदस्य यांनी महाविद्यालयाला विद्यापीठाशी दीर्घकालीन संबंध ठेवण्यासाठी आम्ही या केंद्रासाठी धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाची निवड केली आहे असे नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांपर्यंत विविध संधी उपलब्ध करणे हे या केंद्राचे मुख्य उद्दिष्ट आहे व गोंदिया जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन सुद्धा दिले. सिनेट सदस्य डॉ. प्रथमेश फुलेकर यांनी सुविधा केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, मार्कलिस्ट आणि विविध योजना सहज उपलब्ध होतील यावर चर्चा केली. समारंभाच्या शेवटी महावि?द्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. समय बनसोड यांच्या हस्ते विद्यार्थी सुविधा केंद्राचे औपचारिक उद्घाटन झाले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. कल्पना घोषाल व कु. खुशबू पारधी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.