शिक्षक राजेश कोगदे यांनी केली द्विमान पद्धतीतून बेरीज क्रियेची निर्मिती

0
49

बुलढाणा,दि.१६ः-ग्रामीण पत्रकार संघ व शाळा व्यवस्थापन समिती बोरीअडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल व्यक्तीमत्व विकास शिबीर जि प म उच्च प्राथमिक शाळा बोरीअडगाव ता -खामगाव जि-बुलढाणा येथे दिनांक १३एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी द्विमान पद्धती म्हणजे काय? आणि तिचा उपयोग आपण आपल्या बुद्धिमत्ता वाढीसाठी कसा करु शकतो याचे प्रात्यक्षिक याप्रसंगी शिक्षक राजेश कोगदे यांनी शिबिरामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना करुन दाखवले आणि आश्चर्य म्हणजे काही कालावधीतच विद्यार्थी द्विमान पद्धती शिकले आणि ज्या विद्यार्थ्यांना गणित विषयात आवड नाही किंवा ज्यांना गणित अवघड वाटते अशा विद्यार्थ्यांनी बेरजेची उदाहरणे तोंडी सोडवली.खेळ खेळा आणि बेरीज शिका ही खरोखरंच अफलातून पद्धती आहे असे कार्यक्रमाचे आयोजक रामदास वाघमारे म्हणाले.कोगदे सरांनी द्विमान पद्धतीतून बेरीज क्रियेची केलेली निर्मिती ही निश्चितच विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगी असल्याचे पत्रकार सचिन बोहरपि म्हणाले.