अर्जुनी-मोर.-जिल्हा परिषद स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी यांना शासन स्तरावरून यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार सोहळ्यात गौरवण्यात येते. मात्र मागील दोन वर्षापासून या पुरस्काराची घोषणा झालेली नव्हती. त्यामुळे २०२२ -२३ व २०२३ -२४ दोन्ही वर्षा करिता आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराची घोषणा महाराष्ट्र शासनाने काल ता.१५ रोजी शासन निर्णय निर्गमित करून जाहीर केली. यात जिल्ह्यात चोख कामगिरी बजावणाऱ्या राजकुमार पटले आणि धर्मराज लंजे या दोन्ही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यांचे जिल्ह्यातील राजकीय सामाजिक प्रशासकीय क्षेत्रातून तथा सामान्य जनतेतून अभिनंदन करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यातून एक याप्रमाणे सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.२०२२ -२३ करिता ३३ ग्रामसेवकांची निवड करण्यात आली त्यात सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम पंचायत वडेगाव येथील तत्कालीन ग्राम पंचायत अधिकारी राजकुमार पटले यांचा समावेश आहे. तर २०२३-२४ करिता ३२ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली त्यामध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम पंचायत देवलगाव येथे कार्यरत असताना ग्राम पंचायत अधिकारी धर्मराज लंजे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल राज्य शासनाने घेत यांच्या नावाचा समावेश केला आहे.