गोंदिया १६/०४/२०२५: उन्हाळा संपायला आता १५ ते २० दिवसाचा अवधी शिल्लक आहे. यामुळे निसर्गातील हे बदल आता बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते.वेगाचा वारा व उनाचे झटके बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहेत. निसर्गात होणारा हा नैसर्गिक बदल प्राकृतिक परिवर्तनाचे संकेत देत आहे.
निसर्गाच्या याच पार्श्वभूमीवर महाविरण गोंदिया परिमंडळ सुद्धा, आता आपली कंबर कसली आहे. महावितरण कडून आता याच कामाला सुरुवात झाली असून वीजपुरवठ्यात कोणताही अडथळा येऊ नये, व कोणत्याही ठिकाणी उघड्यावर असलेले विद्युत बॉक्स दुरुस्ती ची व पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे संभाव्य धोके टाळण्यासाठी महावितरण कडून दरवर्षी देखभाल व दुरूस्थी चे कामे केली जातात.याच अनुसंघाने, गोंदिया परिमंडळ येथे महावितरण तर्फे वीज वाहिनीची देखभाल दुरुस्तीच्या कामास सुरवात करण्यात आली आहे.
या कामासाठी, परिमंडळाचे संबंधित अधिकारी वरिष्ठांच्या सूचनेनुसार वीज व वीजवाहिन्यांची देखभाल व दुरुस्ती व याला अडथळा निर्माण होणारी झाडे व त्यांना तोडण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळा सुरू होतांना सुटणारा वाऱ्याने वीज तारा एकमेकावर घसरल्या जाऊन अथवा झाडांमध्ये घासून शॉर्टसर्किट होण्याची शक्यता असते.
त्या साठी तारांवर येणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडणे गरजेचे असते. तारांमधील झोळ कमी करणे, गरजेचे असते.
त्यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या सर्व कामाला, आता वेग देण्यात येत आहे.
गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील प्रामुख्याने वीजवाहिन्याना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या लहान फांद्या तोडून काढणे, लोमकाळलेल्या डिस्क, इन्सुलेटर बदलवणे हे कार्य परिमंडळातर्फे या कालावधीत होणार आहेत. सोबतच, वितरण रोहित्राचे स्पार्किंग तपासणे, तसेच ऑइल फिल्टरेशन, खांब आणि ताराचे मजबुतीकरण करणे, या सर्व बाबीवर लक्ष देण्यात येणार आहे.
या सोबतच, खांबावर लोंबकळणाऱ्या तारा बदलविणे, किवा, झोल करणे व जुन्या फिटर वर पिलरमध्ये इन्सुलेशन्स स्प्रे मारणे व पावसाचा पाणी साचणाऱ्या परिसरातील फिटर पिलर ची जमिनीपासून उंची वाढविणे हे कार्य, महावितरण कडून अपेक्षित आहे.तसेच, पोल सरळ करणे, घरावरील विद्युत तारा उंचविणे, जेणेकरून कोणताही आकस्मिक अपघात घडू नये ही खबरदारी घेणे, गोंदिया परिमंडळ तर्फे सुनिश्चित होणार आहे.