ज्येष्ठ नागरिक व तृतीयपंथीसाठी मोफत आरोग्य तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन

0
30

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह व सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमांतर्गत

गोंदिया, दि.16-: सामाजिक न्याय  विशेष सहाय्य विभागामार्फत  अनुसूचित जातीअनुसूचित जमाती   वंचित दुर्बल  घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडुन विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावीया उद्देशाने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा राज्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” तसेच दि.11 एप्रिल ते 1 मे 2025 या कालावधीत सामाजिक न्याय पर्व हे कार्यक्रम साजरे करण्यात करण्यात येत आहेतसदर कालावधीमध्ये विविध उपक्रम/कार्यक्रम/स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने दि.15 एप्रिल 2025 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनगोंदिया येथील सांस्कृतिक सभागृहात ज्येष्ठ नागरिक व तृतीयपंथी व्यक्ती यांचेकरीता सहयोग हॉस्पीटल गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन तसेच लोकमान्य रक्तपेढी गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरीकतसेच समाज कल्याण कार्यालयइतर मागास बहुजन कल्याण  कार्यालयजिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती  विविध महामंडळातील अधिकारी व कर्मचारी तसेच शासकीय वसतीगृहे  निवासी शाळेतील शिक्षक  शिक्षकेत्तर कर्मचारी आणि अभ्यासिकेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आलीतसेच सदर कार्यक्रमाप्रसंगी कार्यालयातील कर्मचारी  विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता समाज कल्याण निरिक्षक राजेश मुधोळकर, समाज कल्याण निरिक्षक स्वाती कापसे,  मनिषा टेंभुर्णेआशिषकुमार जांभुळकरअजय प्रधानपुष्पलता धांडेयोगेश हजारेमानिकराव ईरलेहेमंत घाटघुमर, पंकज काळेलक्ष्मण खेडकरनिवेदिता बघेलेशैलेश उजवने तसेच  एस2बीव्हीजीक्रिस्टल लिमिटेड बाह्यस्त्रोत कंपनीचे कार्यरत कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.