अर्जुनी मोरगाव,( सुरेंद्रकुमार ठवरे )-आगीच्या घटनांमध्ये घट व्हावी,नागरिकांना अग्निप्रतिबंध व अग्निसुरक्षेबाबत माहिती मिळावी यासाठी अग्निशमन सेवा सप्ताह निमित्ताने नगरपंचायत अर्जुनीच्या वतीने व्यापक जनजागृती मोहिमे अंतर्गत शहरात
बाईक रॅली काढण्यात आली. राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त नगरपंचायत सभागृहात अग्निशमन दलाच्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
देशभर १४ ते २० एप्रिलदरम्यान आयोजित अग्निशमन सेवा सप्ताहात विविध रुग्णालये, व्यापारी, निवासी संकुल, शाळा महाविद्यालये अशा ठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहेत.औद्यागिक व इतर सर्व क्षेत्रातील अग्निशमन सेवांना आपल्या कार्यक्षेत्रात अग्निशमन सेवा सप्ताह प्रभावीपणे पाळने,आगीपासुन निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता व त्यावरील उपाययोजना याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्याकरीता नगर पंचायत अर्जुनीच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.बाईक रॅलीला नगराध्यक्ष बारसागडे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली.यावेळी सभापती यशकुमार शहारे, सभापती दानेश साखरे, नगरसेवक राधेश्याम भेंडारकर,सागर आरेकर, संजय पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेखापाल एकनाथ चौहान, लिपिक सुमित मेश्राम,शुभम गौरकर,दिपक डोंगरवार फायरमॅन निखिल शहारे,धनंजय काळबांधे,कमल कोहरे, दुर्योधन नेवारे, सुरेश बोरीकर, मिथुन कोचे, गौरव शहारे,नयन शहारे,अश्विनी शहारे, शिल्पा सांडेकर,अरविंद लांजेवार यांनी सहकार्य केले