गोंदिया, (दि. 17): ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन व ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र द्वारा घेण्यात आलेल्या विनर ऑफ द इयर या राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत गोंदिया जिल्ह्यातील 47 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर क्रमांक मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे. ज्यात इंदिराबेन हरिहरभाई आहेत पटेल मराठी प्राथमिक शाळा कुडवा मधील इयत्ता 6 वी चा विद्यार्थी पूर्वार्ध सुनिता वशिष्ठ खोब्रागडे 150 पैकी 142 गुण घेऊन राज्यात पाचवा आला असल्याने सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.
विनर ऑफ द इयर ही परीक्षा वर्षभराच्या शालेय अभ्यासक्रमावर आधारीत असून ती दिनांक 2 मार्च 2025 ला राज्यात एकाच दिवशी घेण्यात आली होती. या परीक्षेत राज्यभरातून 17 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी करून परीक्षा दिली होती. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा व अर्जुनी मोर वगळता इतर सहा तालुक्यांमध्ये जवळजवळ 300 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या परीक्षेचे आयोजन जिल्हाप्रमुख वशिष्ठ खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ठाणा(ता. आमगाव), जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिरडामाली (ता. गोरेगाव), जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खडकी (ता. तिरोडा), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धिवरिनटोला (ता. देवरी), जिल्हा परिषद हायस्कूल सडक अर्जुनी आणि जानकीदेवी चौरागडे हायस्कूल कुडवा (ता. गोंदिया) या केंद्रावर पार पडली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून जिल्ह्यातील 47 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर क्रमांक मिळवून आपले नाव उंच केले आहे.
पहिल्या 10 मध्ये असलेले विद्यार्थी:-
इयत्ता 1ली मधून भेलावे कुश तिष्यकुमार, मॉडेल कॉन्व्हेन्ट वडेगाव, (तिरोडा) राज्य रँक 6वी,
• इयत्ता 2 री मधून येळे मिहान राजकुमार, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ठाणा (आमगाव), राज्य रँक 5, शेंद्रे प्रिन्स सूर्यकिरण, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ठाणा, (आमगाव) राज्य रँक 7, कु. राऊत क्रिस्टी डीकेस, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनेरी (सडक अर्जुनी) राज्य रँक 10
इयत्ता 7 वी – कु. वंजारी रिया राजेश, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ठाणा, (आमगाव) राज्य रँक 8,
इयत्ता 6 वी – खोब्रागडे पूर्वार्ध वशिष्ठ, IHP प्राथ. शाळा कुडवा (गोंदिया), राज्य रँक 5.
इयत्ता 4 थी – कु. कापगते भावी प्रमोद, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिरडामाली (गोरेगाव), राज्य रँक 9., कु. संभवी सुनिता वशिष्ठ खोब्रागडे, IHP प्राथ. शाळा कुडवा (गोंदिया), राज्य रँक 10.
इयत्ता 5 वी – रहांगडाले क्रिश विनोद, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रापेवाडा (गोंदिया), राज्य रँक 10.
इयत्ता 7 वी – कु. पारधी युक्ती सुरेश, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रापेवाडा (गोंदिया), राज्य रँक 10.
सर्व विद्यार्थ्यांचे शाळा मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले आहे.