गोंदिया–परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त सडक अर्जुनी येथील शेंडा चौकात बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने रॅलीत सहभागी समाज बांधवाना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मठ्ठा वितरण कार्यक्रम घेण्यात आला
या प्रसंगी अर्जुनी मोरगाव चे आमदार श्री.राजकुमार बडोले साहेब यांनी भेट देऊन जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या
सदर मठ्ठा वितरण कार्यक्रम हा शिक्षक समिती तर्फे दरवर्षी जिल्हा आणि तालुका स्तरावर आयोजित केला जातो
या वेळी शिक्षक समितीचे विभागीय अध्यक्ष तथा गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर डोंगरवार, तालुकाध्यक्ष जीवन मशाखेत्री, सरचिटणीस रतन गणवीर, बाळू वालोदे, नरेश मेश्राम , प्रदीप बडोले, हेमंत मडावी, चोपराम गोबाडे, अरविंद कापगते, पुरुषोत्तम नेवारे, पारस कोरे, बी जे एरणे, डी पी पर्वते, अरुण वैद्य, राजेश शेंडे, पी सी चचाने ,
टी एस मानकर, पी एस उके
जे बी कराडे ,पी एन बडोले, सोहन कापगते, एम एम क्षीरसागर, सुरेश बांबोडे, अजित रंगारी, राजू कोटागले, डी एस राऊत, श्याम भंडारे उपस्थित होते.