सडक अर्जुनी,दि.१७ एप्रिल- अर्जुनी-मोर विधानसभा क्षेत्रातर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियान या महत्वपूर्ण विषयावर १५ एप्रिल २०२५ रोजी आमदार राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.या बैठकीत आमदार राजकुमार बडोले यांनी उपस्थितांना पक्ष संघटन, जबाबदाऱ्या आणि कार्यपद्धती यावर सखोल मार्गदर्शन केले.
आमदार राजकुमार बडोले यांनी सांगितले की, ३१ मार्च २०२५ पर्यंत सदस्य नोंदणी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने अधिक जोमाने आणि जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. पक्ष संघटना बळकट करताना जनतेच्या प्रश्नांवर प्राधान्याने लक्ष देऊन एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन यावेळी केले.
बैठकीस अर्जुनी-मोर तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, सडक अर्जुनी तालुकाध्यक्ष डॉ. अविनाश काशीवार, नगराध्यक्ष तेजराम मडावी, ओबीसी जिल्हा अध्यक्ष किशोर तरोणे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर, माजी जि.प. सदस्य रुपविलास कुरसुंगे,आनंदराव अग्रवाल,भोजराम रहेले,दानेश साखरे,राकेश लंजे,भैय्यालाल पुस्तोडे,गजानन परशुरामकर, भोला पाटील कापगते, रजनीताई गिरीपुंजे, सुशीलाताई हलमारे,दिनेश कोरे,अनिल बिलीया,आर. के. जांभुळकर, श्री. श्रावण मेंन्ढे,सोविंदा नागपुरे यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.