अर्जुनी-मोर.,दि.१७ः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा टप्पा -२ हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता राबविण्यात येत असून, सदर अभियानातंर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ,मोरगावला तालुक्यात प्रथम क्रमांक तर जिल्हा स्तरावर तृतीय स्थान मिळाले आहे. सदर उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन यश प्राप्त करणाऱ्या शाळेचे प्रोत्साहनपर अभिनंदन पर कार्यक्रम पंचायत समिती कार्यालय येथील बचत भवन येथे पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर तर अध्यक्षस्थानी पंचायत समिती अर्जुनी/ मोर. च्या सभापती आम्रपालीताई डोंगरवार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, खंडविकास अधिकारी पल्लवी वाडेकर ,जिल्हा परिषद सदस्य कविताताई कापगते ,जयश्री देशमुख अर्जुनी /मोर. चे उपसभापती संदीप कापगते,पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे, नाजूक कुंभरे ,पंचायत समिती अर्जुनी/मोरचे गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण, गटसमन्वयक सत्यवान शहारे उपस्थित होते.
अलीकडे जिल्हा परिषद शाळा सुद्धा कात टाकत असून ,गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी तत्पर असल्याचे समाधान जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामभाऊ भेंडारकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. याप्रसंगी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ऊतीर्ण विद्यार्थी, एन. एम .एम .एस. शिष्यवृत्ती परीक्षा व्हिडिओ मेकिंग स्पर्धा ,अशा विविध स्पर्धेत यश प्राप्त विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे स्मृतिचिन्ह देऊन,अभिनंदन करण्यात आले.
प्रस्तुत अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक ,शिक्षणप्रेमी,ग्रामपंचायत मोरगाव व नागरिकांनी भरभरून सहकार्य करून, ग्राम पातळीवर दर्जेदार व गुणवत्तापूर्वक शाळा निर्मितीसाठी हातभार लावला.
शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये सुद्धा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव पंचायत समिती- अर्जुनी/ मोर यांनी अदानी फाॅंऊडेशनच्या ‘ आमची शाळा-सुंदर शाळा ‘उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन तालुका पातळीवर प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविले होते. तसेच मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा टप्पा -१ मध्ये तालुक्यात तृतीय स्थान मिळविले होते हे विशेष.
सदर उपक्रमाची जिल्हा पातळीवर मूल्यांकन करण्यासाठी शिक्षणाधिकारी( प्राथमिक )सुधीर महामुनी, उपशिक्षणाधिकारी अशोक लांडे, शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मण चव्हाण व पौर्णिमा विश्वकर्मा यांनी प्रत्यक्ष मूल्यांकन करून विद्यार्थ्यांचे गुणवत्ता विषयक व भौतिक सुविधांची उपलब्धतेबाबतची माहिती जाणून घेतली.
सदर उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मुख्याध्यापक सु.मो. भैसारे, विषय शिक्षक पी. टी. गहाणे, व्ही. बी. भैसारे ,जे. एन. ठवकर, वामन घरतकर,आर. पी. उईके, अचला कापगते, रूपाली मेश्राम, ऋशेश्वर मेश्राम यांनी यथोचित प्रयत्न केले. जिल्हा स्तरावर शाळेचे लौकिक केल्यामुळे सरपंच गीता नेवारे, जिल्हा परिषद सदस्या कविता कापगते,माजी सभापती सविता कोडापे,उपसरपंच उमाकांत पालिवाल, तंटामुक्त समिती अध्यक्ष रमेश लाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी लोदी ,पोलीस पाटील रमेश झोडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सोनूताई कराडे, सदस्य मुनेश्वर शहारे ,ग्रा.पं. सदस्य विद्या शहारे, पद्मिनी चचाने,मुरारी उईके, देवानंद शहारे,अंगणवाडी सेविका शीला वासनिक ,छाया लोदी,आदिंनी शालेय प्रशासनाचे व शिक्षक वृंदाचे अभिनंदन केले.