मागील एक वर्षांपासून बंधारा तुटलेल्या अवस्थेत

0
35

वनविभागाच्या कार्यपप्रणालीवर प्रश्नचिन्ह

कोरची : मागील काही दिवसांपासून भोंगळ कारभारासाठी चर्चेत असलेल्या वनविभागाचे अजून एक प्रताप बघायला मिळाले असून कोरची मुख्यालयापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या नवरगाव येथे उन्हाळ्यात जनावर व परिसरातील नागरिकांना पाणी उपयोगात येईल या उद्देशाने मागील वर्षी अंदाजे 7 लाख रुपये शासनाचे खर्च करून बंधारा बांधण्यात आला. परंतु अवघ्या एका महिन्यातच सदर बंधारा वाहून गेल्यामुले कामाची गुणवत्ता व वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

वनपरीक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदाराला 1.40 लाख रुपयाचे देयक देण्यात आले असून उर्वरित रक्कम जमा न झाल्यामुळे कदाचित देण्यात आले नसावे. सदर कामाच्या ठिकाणी कुठलेही कामाचे व यंत्रणाचे फलक लावण्यात आलेले नाही.वनपरीक्षेत्र कार्यालय बेडगाव येथीलवनपरीक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी संबंधित कंत्राटदाराला तोंडी माहिती दिल्याचे सांगितले असून सदर बंधारा दुरुस्तीचे कुठलेही पत्र व्यवहार झाले नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

बांधकामात लोखंडाचा वापर नाही

कुठल्याही बंधाऱ्याचे बांधकाम करीत असताना त्यामध्ये लोखंडाचा वापर करण्यात येत असतो. परंतु सदर बंधाराच्या बांधकामात कुठलेही लोखंड दिसून न आल्यामुळे गुणवत्तेवर सुद्धा खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्यामुळे याची सखोल चौकशी करून (Forest department Dam) कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.