माहूरकुडा शिरोली रस्त्यावर शालेय बसची दुचाकीला धडक

0
152

दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी
अर्जुनी मोर — महागाव माहूरकुडा ते शिरोली मार्गावर शालेय बसने मोटर सायकलला धडक दिल्याने मोटर सायकल वर प्रवास करणारे दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 17 एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की बस क्रमांक एम एच 35 जे 36 34 ही अर्जुनी मोर येथील सरस्वती विद्यालयाची शाळकरी विद्यार्थी वाहतूक करणारी शालेय बस असून शाळेतील विद्यार्थी सुट्टी झाल्यानंतर अर्जुनी मोर वरून महागाव ला सोडत असताना बस चालक कुंडलिक बावनकर यांनी मोटरसायकल क्रमांक एम एच 35 ये एफ 56 30 ला धडक दिली.यात मोटर सायकलवर असणारे दोन युवक भोजराज पुस्तोडे वय 38 वर्ष राहणार महागाव व प्रकाश निपाणी वाई ३७ वर्ष राहणार भंडारा हे गंभीर जखमी झाले.दोन्ही युवक महागाव वरून अर्जुनीकडे जात होते जखमींना आधी प्राथमिक उपचारासाठी महागाव येथील प्राथमिक उपकेंद्र व त्यानंतर ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे 18 जुलै 2024 रोजी याच मार्गावर याच गाडीने याच चालकाने वीज वितरण विभागात काम करणाऱ्या हरि कोहरे यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता तर आज याच चालकाने दुसऱ्यांदा अपघात केल्याने परिसरात विविध चर्चांना उत आले आहे.