राष्ट्र निर्माण हेच बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न-उत्तम कांबळे         

0
32
  नागपूर, दिनांक १८ एप्रिल : लोकांना सामाजिक विषमतेतून बाहेर काढले पाहिजे तेव्हाच खरे राष्ट्र निर्माण होईल, बाबासाहेब यांचे निम्मे आंदोलन हे सामाजिक जागृती करण्याकरिता होती, अशी माहिती सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी, कादंबरीकार, पत्रकार, संपादक, विचारवंत आणि परखड वक्ते उत्तम कांबळे यांनी दिली.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त महावितरण, नागपूर परिमंडळातर्फे आयोजित विशेष व्याख्याना प्रसंगी ते बोलत होते.
 नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी महापारेषणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सतिश अणे आणि मराविमं सूत्रधारी कंपनीचे प्रभारी मुख्य अभियंता राकेश जनबंधू ,  नागपूर शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, प्रादेशिक कार्यालयाचे अधीक्षक अभियंता (प्रकल्प) मंगेश वैद्य, अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) संजय वाकडे उपस्थित होते.
आजही ९० टक्के लोक हे ज्ञानापासून दूर आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी भांडवलशाही व खाजगीकरणाला विरोध केला, प्रत्येक नागरिकांची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे व सर्वांना समान संधि मिळाला पाहिजे हेच बाबासाहेबांनी आपणास संविधान च्या माध्यमातून सांगितले असल्याचेही कांबळे यावेळी म्हणाले.
या प्रसंगी महापरेषणचे मुख्य अभियंता श सतीश अणे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले,  मुख्य अभियंता  दिलीप दोडके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महापुरुषांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे व या पुढे आपण जयंती निमित्त ५ ते ६ तास पुस्तक वाचण्याचा कार्यक्रम ठेवू असे सांगितले.
 कार्यक्रमाला महावितरण व महापारेषणचे अधिकारी तसेच विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी  मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशांत शृंगारे, संचालन आनंद कांबळे तर आभार प्रदर्शन सुभाष मुळे यांनी केले.