देवरी,दि.१९ः-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल हे क्षेत्रातील प्रगतीचा व उन्नतीचा दृष्टीकोन ठेवणारे एकमेव नेतृत्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेतकरी, कष्टकरी सर्व सामान्य जनतेच्या हिताचे कार्य हि पक्षाची विचारधारा असून आपल्या पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून पक्षाला बळकटी देण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक गावात सर्व कार्यकर्त्यांनी बूथ मजबुतीकरिता नियोजन करावे व जास्तीत जास्त सदस्य जोडण्यासाठी सभासद नोंदणी करावी असे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी मार्गदर्शन केले.
मॉ धुकेश्वरी मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देवरीच्या वतीने माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत सभासद नोंदणीला सुरुवात करण्यात आली. तालुक्यात पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साहात सदस्यता नोंदणी अभियानात सहभाग नोंदवला.
यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, सुरेश हर्षे, रमेश ताराम, छोटेलाल बिसेन, जियालाल पंधरे, गोपाल तिवारी, भय्यालाल चांदेवार, हिनाताई टेम्भरे, पंकज सहारे, प्रल्हाद भोयर, नेमीचंद आंबिलकर, दुरुगकरजी, परबताबाई चांदेवार, शर्मिला टेम्भूर्णीकर, सुमनताई बिसेन, मनोहर राऊत, चुन्नीलाल शहारे, कमलाताई मस्के, लक्ष्मी मेश्राम, वर्षाताई बडवाईक, सीमा साखरे, परमेश्वरी नंदेश्वर, त्रिशला मेश्राम, प्रभाताई चौधरी, ललिता टेम्भूरकर, विंदाताई अंबादे, मालता निर्वाण, संगीत यावलकर, गीता उईके, ममता पाथोडे, सविता चौधरी, भूमेश्वरी रहांगडाले, मंजू गोस्वामी, उत्तरा रहिले, ज्ञानेशर भोयर,कृष्णा भोयर, भास्कर गावड मुनेश्वर भोयर योगेश देशमुख प्रवचन राऊत महादेव शामकुवर, पोशीककुमार सहारे, रंजन मेश्राम, राजेश बिंजलेकर, सत्यवान देशमुख, प्रल्हाद भोयर सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.