दिल्ली:-दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये शुक्रवारी रात्री उशीरा एक रहिवाशी कोसळल्याची घटना समोर आली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंच चौघांचा मृत्यू झाला आहे, तर 15 हून अधिक जण जखमी आहेत. एनडीआरएफची टीम घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य करत आहे.
इमारतीचा ढिगारा लवकरात लवकर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक लोक दबले असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी इमारतीत सुमारे दोन डझन लोक उपस्थित होते. यापैकी आतापर्यंत 12 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. तर अजूनही 10 हून अधिक लोक अडकल्याची भीती आहे.
बचाव कार्यात एनडीआरएफ आणि पोलिस कर्मचाऱ्यांना स्थानिक लोकही बचावकार्यात मदत करत आहेत. घटनेची माहिती मिळताच अनेक स्थानिक लोक घटनास्थळी उपस्थित आहेत आणि ढिगारा हटवण्यासाठी इतर पथकांना मदत करत आहेत. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, या इमारतीत तीन ते चार कुटुंबे राहत होती. यामध्ये भाडेकरू आणि घरमालक एकत्र राहत होते. ढिगाऱ्याखाली 20 ते 25 लोक गाडले असल्याचा अंदाज आहे.