*राष्ट्रीय पंचायत पुरस्कार -देशातून प्रथम*
गोंदिया ता. 20 :- जिल्ह्यातील सडकर्जुनी तालुक्यातील डव्वा/स ग्रामपंचायतीने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2023 -24 अंतर्गत भारत देशातून प्रथम पुरस्कार पटकविला आहे. हवामान बदलाचे होणारे दुषपरिणाम रोकण्यासाठी यावर ग्रामपंचायतीने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल *क्लायमेट ऍकशन स्पेसिएल पंचायत अवॉर्ड* हा पुरस्कार मिळाला आहे.परिणामी ही ग्रामपंचायत एक कोटी पुरस्काराची मानकरी ठरली आहे. तर कर्नाटक राज्यातील बिरडाहल्ली ग्रामपंचायतीने द्वितीय आणि बिहारच्या मोतीपूर ग्रामपंचायतीने तृतीय पुरस्कार पटकविला आहे.या पुरस्काराची घोषणा आज 20 एप्रिल रोजी शासनाने जाहिर केली आहे.
दरम्यान ग्रामपंचायत डव्वाच्या या विशिष्ट कामगिरीचे कौतुक करून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम एम आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एम. वासनिक यांनी अभिनंदन केले आहे.
डव्वा/स ग्रामपंचायतिच्या सरपंच योगेश्वरी चौधरी,ग्रामपंचायत अधिकारी सिंधू रामचंद्र सूर्यवंशी यांनी माध्यमाना सांगितले आहे की,पृथ्वीवरील वाढत्या प्रदूषणामुळे तापमाणात वाढ होत आहे. याचा परिणाम मानवी शरीर आणि वनस्पती पिकावर होत आहे. हे थांबवायचे असेल तर आधी ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याची गरज आहे.असे सांगून घरोघरी सौर ऊर्जेचा वापर करणे, प्लास्टिक बंदी, फटाके बंदी अस्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत. निसर्गाच्या पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश पंचतत्वासोबत जीवन पद्धती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकनार नाही, एवढेच नाहीतर जैवविविधतेचेही अस्तित्व राहणार नाही याची जाणीव ठेवून आमच्या ग्रामपंचायतीने हे पाऊल उचलले आहे. असे त्यांनी सांगितले.
गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम यांच्या मार्गदर्शनात आम्ही आमचं गांव राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारासाठी सज्ज करण्याचा प्रण केलेला आहे, यासाठी ग्रामपंचायतिचे सर्व सदस्य आणि गावकऱ्यांचे सहकार्य लाभले आहे.
भारतसरकार दिल्लीच्या चमुने गेल्या 11एप्रिल रोजी या ग्रामपंचायतीची पाहणी केली. या चमूमध्य श्रीमती अनुराधा आणि श्रीमती नीलिमा गोएल या अधिकाऱ्यांचा समावेश होता.
हा पुरस्कार मिळविण्यासाठी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरूगानंथम, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, उप मुख्यकार्यकारी अधिकारी एम. एम. वासनिक, एस. आय. वैद्य,सडक अर्जुनी पंचायत समितीचे सभापती चेतन वडगाये, उपसभापती निशाताई काशिवार, गट विकास अधिकारी रविकांत सानप, दिलीप खोटेले,यांच्या मार्गदर्शनात विस्तार अधिकारी रवींद्र पराते, वाय. सि. पटले,उपसरपंच सुनील घासले,ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,सर्व ग्रामपंचायत अधिकारी आणि गावकरी यांनी अथक परिश्रम घेतले.