-कुलगुरू कक्षात आयोजित कार्यक्रमात फोल्डिंग हेल्मेट संशोधनाचे केले कौतुक
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे व संशोधक विद्यार्थीनी आदिती देशमुख यांचा वीआर सेफ फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. समाजपयोगी फोल्डिंग हेल्मेटचे नाविन्यपूर्ण संशोधन केल्याने कुलगुरू कक्षात आयोजित कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला.
यावेळी माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे तसेच वीआर सेफ फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री विजय शर्मा यांच्या हस्ते संशोधक डॉ. संजय ढोबळे व विद्यार्थिनी आदिती देशमुख यांचा शाल श्रीफळ तसेच स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी फाउंडेशनच्या वतीने कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांचा देखील सत्कार करण्यात आला. दुचाकी स्वारांसाठी उपयुक्त ठरेल असे फोल्डिंग हेल्मेट विद्यापीठातील संशोधकांनी तयार केले आहे. दोघांचेही हेल्मेट एकाच दुचाकीमध्ये ठेवता येणारे नाविन्यपूर्ण संशोधन केल्याने वीआर सेफ फाउंडेशनच्या वतीने हा सत्कार करण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे सर्वश्री मनीष सकोडे, आदिश अग्रवाल, अमित शर्मा, नितीन फुलेवाले, अमित काकडे, सचिन यादव व अनिकेत उमाठे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.