अर्जुनी मोरगाव 🙁 सुरेंद्रकुमार ठवरे ) भारतीय जनता पार्टी अर्जुनी मोरगाव तालुकाध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक होते. पक्ष निरीक्षकांनी तालुकाध्यक्ष पदासाठी योग्य उमेदवाराबाबत मत जाणून घेतले होते. त्यानुसार ता.२० रोजी स्थानिक खरेदी विक्री सभागृहात भाजप कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार संघटनात्मक बांधणी लक्षात घेऊन अर्जुनी मोरगाव नगरपंचायत चे नगरसेवक राधेश्याम भेंडारकर यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. <br>भेंडारकर यांची अचानक झालेली निवड तालुका भाजपमध्ये सुखद धक्का मानला जात असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. भेंडारकर यांच्या निवडीमुळे अर्जुनी मंडळ क्षेत्रात संघटनात्मक बळकटीला नवे बळ मिळणार असल्याचे मत उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. युवा आणि पक्षासाठी हिरारीने काम करणाऱ्या भेंडारकर यांच्यावर भंडारा-गोंदिया भाजप संघटन मंत्री विरेंद्र ( बाळाभाऊ ) अंजनकर, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी टाकलेला विश्वास लक्षणीय समजला जात आहे. अर्जुनी मंडळाच्या अध्यक्षाची निवड झाली मात्र केशोरी मंडळाच्या अध्यक्षपदी कोण याची उत्सुकता परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये लागली आहे.
यावेळी महिला बालकल्याण सभापती पौर्णिमा ढेंगे, माजी तालुकाध्यक्ष विजय कापगते तथा इतर वरिष्ठ नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे तालुक्यात भारतीय जनता पार्टी नव चैतन्य निर्माण झाले असून युवा कार्यकर्त्याला थेट तालुकाध्यक्षपदी संधी मिळाल्यामुळे भारतीय जनता पार्टी उल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे.भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह अनेक वरिष्ठ नेत्यांनी भेंडारकर यांचे अभिनंदन करत आगामी काळात त्यांच्याकडून उत्कृष्ट नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
” तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व नेत्यांचे आभार मानत पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास राधेश्याम भेंडारकर यांनी कार्यकर्त्यांना दिला. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविणे आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सक्रियपणे आवाज उठवणे, हेच माझे मुख्य ध्येय राहील असेही राधेश्याम भेंडारकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले.”