सालेकसा –तालुक्यातील लोहारा तीरखेडी येथे लग्नात नवरदेवाच्या बग्गी गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने बगी खाली येऊन एका महिलेचामृत्यू तर एक गंभीर झाल्याची घटना काल रात्री 20 एप्रिल रोजी घडली.
लोहारा येथे मुकेश सहारे यांच्या दोन मुलींचा लग्न २० एप्रिल रोजी यांच्या निवासस्थानी होत असल्याने दोन नवरदेव लोहारा या गावी आले होते त्यात एक झांझिया व दुसरी तिरोडा गोंडमोहाडी येथील वरात नाचत गाजत नवरीच्या घरी जात असताना रस्त्यावर एका महिलेचा पाय रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात गेल्याने ती महिला रस्त्यावर नवरदेवाच्या बगी समोर पडली त्याच वेळी बगीचे ब्रेक न लागल्याने बग्गी सरळ त्या महिलेच्या अंगावरून गेल्याने त्या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली. मृत्यू झालेली महिला गोपीका भाऊलाल ढोमणे, वय 70 वर्षे, रा. गोंडमोहाडी, ता. तिरोडा, जिल्हा गोंदिया, व दुसरी महिला गंभीर जखमी कांताबाई टिकाराम भंडारी, वय अंदाजे 60 वर्षे, रा. घोटी (गोरेगांव), ता. गोरेगांव, जिल्हा गोंदिया हे आहेत.
आमंत्रित पाहुण्यांसह लग्न लावण्यास वधु मंडपी पायी जात असताना बग्गी (वर वधु चारचाकी रथ) वाहन क्रमांक MP. 48.D.0366 चालकाने आपले ताब्यातील चारचाकी वाहन लापरवाहीने, हयगयीने व निष्काळजी पणे चालवुन यातील मृतक व जखमीना धडक दिल्याने मृतक चे डोक्याला मार लागुन तिचे मरणास, तसेच यातील जखमी हिचे दोन्ही पायाला दुखापत होण्यास कारणीभुत झाल्याचे फिर्यादिचे तोंडी रिपोर्ट व वैद्यकीय अभिप्राय वरुन तसेच ठाणेदार. यांचे आदेशान्वये सदरचा गुन्हा आरोपी बन्नी (वर वधु चारचाकी रथ) वाहन क्रमांक MP. 48.D.0366 चा चालक
अंकित कटरे लोहारा यांच्यावर नोंद करुन तपासात घेतला