तीन तोळ्यांचा राणीहार चोरून महिलेने बसमधून उतरुन

0
38

अहिल्यानगर,दि.२१ः- सध्या लग्न सोहळे मोठया प्रमाणात सुरू आहेत. मात्र अनेकदा हे सोहळे महागात पडत1आहेत. पाथर्डी तालुक्यात बस प्रवास करताना गर्दी अन चोरी हे समीकरण बनले आहे. नुकताच याचा प्रत्यय एका महिलेला आला आहे.

पाथर्डी तालुक्यातील विवाह सोहळ्यासाठी जाणाऱ्या एका महीलेचा साडेतिन तोळे वजनाचा सोन्याचा राणीहार करंजी ते तिसगाव या एसटी प्रवासात एका महीलेने चोरल्याची घटना सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. सदरच्या महीलेने हार चोरणाऱ्या महीलेचा पाठलाग देखील केला मात्र चोरटी महीला तिसगाव मधुन मिरी रोडने घाईने निघुन गेली.

याप्रकरणी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी वैशाली चंद्रकांत शिंदे (रा. देवगाव,ता. आहिल्यानगर) या सोमवारी सकाळी नातेवाईकांच्या गाडीतुन करंजी येथे आल्या तेथुन त्यांना ढवळेवाडी येथे नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी जायचे होते.

यामुळे त्या करंजीतुन पाथर्डीकडे येणाऱ्या एसटीबसमधे सकाळी साडेदहा वाजता त्या बसल्या. देवराईमधे आल्यानंतर तिकीट काढण्यासाठी पर्सकडे पाहीले असता पर्सची चैन उघडी असल्याचे दिसले. त्यानंतर तिकीट घेतले. व पर्समधे एका डबीत असलेला साडे तिन तोळ्याचा सोन्याच राणी हार व ती डब्बी पर्समधे पाहीली असता दिसली नाही.

गाडीत खुप गर्दी होती.मात्र शेजारी उभ्या असलेल्या एका महिलेने राणी हार चोरल्याची खात्री झाली. तिसगावमधे ही महीला घाईने गाडीतुन उतरली.शिंदे यांनी गाडीतुन उतरुन तिचा पाठलाग केला मात्र ती मिरी रोडने पसार झाली. शिंदे यांनी त्यांच्या वडील व भाऊ अशा नातेवाईकांना झालेला प्रकार सांगितला. पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिस तपास करीत आहेत.