धार्मिक भावना दुखावणार्या आरोपीच्या जामीन अर्जावर उद्या होणार निर्णय

0
108

गोंदिया, ता. २१ : शहरातील गणेशनगर परिसरात एका दुकानात धार्मिक भावना दुखावतील असे  छायाचित्र असलेले टाइल्स लावल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली होती. त्याची भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. आरोपीकडून वकिलाने जामिनासाठी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर सोमवारी ( ता. २१)  सुनावणी  झाली.  मात्र, जामीन अर्जावर न्यायाधीशांनी आदेश राखीव ठेवला असून, मंगळवारी ( ता. २२)  निर्णय होणार असल्याची माहिती आहे.
शहरातील गणेशनगर येथील आरोपी चिराग संदीप रुंगठा (वय ३५) याने त्याच्या दुकानात धार्मिक भावना दुखावतील असे छायाचित्र असलेले टाइल्स लावले. या प्रकाराची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारीत होताच काही संतप्त नागरिकांनी १६ एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपीचे दुकान गाठून त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले होते. कश्यप राजाबाबा वासनिक (वय २३, रा. मरारटोली) याच्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला. आरोपीला १७ एप्रिल रोजी येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपीची भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. आरोपीला जामिनासाठी त्याच्या वकीलाने जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. सोमवारी यावर सुनावणी झाली. आरोपीला चोख पोलिस बंदोबस्तात येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. ए. एस. प्रतिनिधी यांच्या खंडपिठात सुनावनी झाली. दरम्यान, न्या. प्रतिनिधी यांनी दोन्ही पक्षाच्या वकिलांचे म्हणणे एकूण घेत यावर निर्णय राखून ठेवला.  आता मंगळवारी होणार्‍या निर्णयाकडे लक्ष लागून आहे.